Two time lottery winner : नशीबाचा डबल बार! पहिल्या लॉटरीत कोट्यवधी जिंकणारी तरुणी दुसऱ्यांदाही मालामाल, दोन्ही वेळा घडली ‘ही’ कॉमन गोष्ट

सलग दोन वेळा कोट्यवधी रुपयांची लॉटरी जिंकणाऱ्या तरुणीची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा तिकीट घेताना काही गोष्टी कॉमन घडल्याचं ती सांगते.

Two time lottery winne
महिलेला दुसऱ्यांदा कोट्यवधींची लॉटरी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • 2020 साली जिंकली होती 1.9 कोटींची लॉटरी
  • गेल्या आठवड्यात पुन्हा लागला 1.5 कोटींचा जॅकपॉट
  • दोन्ही वेळी घडल्या काही कॉमन गोष्टी

Two time lottery winner : नशिबावर (Luck) विश्वास ठेवायचा की नाही, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. मात्र अनेकदा अशा काही घटना घडतात, की त्या पाहिल्यावर प्रत्येकालाच आश्चर्य वाटतं. लॉटरी ही त्यापैकीच एक गोष्ट. अनेकदा पैसे कमावण्यासाठी लॉटरीचं तिकीट घेणाऱ्यांना ती कधीच लागत नाही, पण सहज म्हणून एखादं तिकीट कुणीतरी घेतं आणि त्याचं नशीब फळफळतं. अमेरिकेतील एका महिलेच्या बाबतीत जे घडलं ते पाहून मात्र अनेकांना आश्चर्य वाटत आहे. दोनच वर्षांपूर्वी ही महिला तिला लागलेल्या लॉटरीमुळे चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा या महिलेला लॉटरी लागली असून दुसऱ्यांदा तिच्यावर पैशांची बरसात झाली आहे. 

2020 मध्ये लागली होती लॉटरी

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना भागात राहणाऱ्या या महिलेनं 2020 साली कोलंबियातील एका दुकानातून लॉटरीचं तिकीट विकत घेतलं होतं. ते तिकीट तिनं पर्समध्ये ठेऊन दिलं. आपण तिकीट घेतलं आहे हे ती काही काळासाठी विसरूनही गेली होती. मात्र जॅकपॉट जाहीर झाला आणि तिने आपल्या तिकीटीचा नंबर तपासून पाहिला. आपल्याला पहिल्या नंबरचं बक्षीस मिळाल्याचं तिच्या लक्षात आलं आणि तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिला 1 कोटी 90 लाख रुपयांचा जॅकपॉट लागला होता. 

दोन वर्षांत दुसरी लॉटरी

या महिलेला आता दुसऱ्यांदा जॅकपॉट लागला आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेनं पुन्हा एकदा लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. मात्र हे तिकीटही तिच्यासाठी फलदायी ठरलं. या लॉटरीत तिला 1 कोटी 50 लाख रुपये मिळाले. दुसऱ्यांदाही लॉटरी लागल्यामुळे मालामाल झालेल्या या तरुणीनं त्या पैशांचं आपण काय करणार आहोत, हेदेखील सांगितलं आहे. 

अधिक वाचा - जिनपिंग यांच्या तिसऱ्या टर्मला विरोध

एक गोष्ट कॉमन

पहिल्यांदा लॉटरीचं तिकीट खरेदी करताना ज्या गोष्टी घडल्या त्यातील काही गोष्टी दुसऱ्यांदा तिकीट घेतानाही घडल्याचं ही महिला सांगते. पहिलं तिकीट तिनं कोलंबियातील ज्या स्टोअरमधून खरेदी केलं होतं, त्याच स्टोअरमधून दुसरं तिकीट खरेदी केलं. शिवाय पहिलं तिकीट खरेदी करताना तिच्यासोबत जी व्यक्ती होती, तीच व्यक्ती दुसरं तिकीट खरेदी करतानाही होती, असा अनुभव तिनं शेअर केला आहे. अर्थात, हा केवळ योगायोग असून कुठल्याही अंधश्रद्धेवर लोकांनी विश्वास ठेवू नये, असं आवाहन तिनं केलं आहे. 

घेणार नवं घर

पहिल्यांदा लॉटरी जिंकल्यानंतर आपण खूप मौजमस्ती केली. आपल्याला हवे असणारे कपडे, पदार्थ आणि पर्यटन यात बरेचसे पैसे खर्च केल्याचं ती सांगते. या पैशातून मात्र ती स्वतःसाठी एक चांगलं घर खरेदी करणार आहे. 

अधिक वाचा - ३०० वर्षांपूर्वी बुडलेल्या जहाजाच्या अवशेषांमध्ये सापडला कोट्यवधींचा खजिना

तरुणालाही लागली होती लॉटरी

गेल्याच महिन्यात अमेरिकेत एक तरुणही जॅकपॉट जिंकल्यामुळे चर्चेत आला होता. त्याने तब्बल 15 कोटींचा जॅकपॉट जिंकला होता. सकाळी झोपेतून उठल्यानंतर घरातील दूध संपल्याचं या तरुणाच्या लक्षात आलं. कॉफी करण्यासाठी दूध हवं, म्हणून तो शेजारच्या स्टोअरमध्ये गेला. झोपेतच त्यानं दूध खरेदी केलं. तिथेच लॉटरी तिकीटाचं काउंटर होतं. तिथून त्याने गंमत म्हणून तिकीट खरेदी केलं आणि दुसऱ्या दिवशी तो करोडपती झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी