10 big VIP Air Tragedy व्हीआयपींशी संबंधित भारतातील दहा मोठ्या हवाई दुर्घटना

From Sanjay Gandhi, Madhav Rao Scindia To Lok Sabha Speaker And 2 Chief Ministers Have Been Killed सीडीएस बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. या घटनेच्या निमित्ताने अनेकांना भारतातील हवाई दुर्घटनांबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. झटपट जाणून घेऊ व्हीआयपींशी संबंधित भारतातील दहा मोठ्या हवाई दुर्घटना.

10 big VIP Air Tragedy : From Sanjay Gandhi, Madhav Rao Scindia To Lok Sabha Speaker And 2 Chief Ministers Have Been Killed
व्हीआयपींशी संबंधित भारतातील दहा मोठ्या हवाई दुर्घटना 
थोडं पण कामाचं
  • व्हीआयपींशी संबंधित भारतातील दहा मोठ्या हवाई दुर्घटना
  • ३१ मार्च २००५ - हरयाणाचे ऊर्जा मंत्री ओ. पी. जिंदल यांचा विमान अपघातात उत्तरप्रदेशमधील सहारनपूर जिल्ह्यात मृत्यू
  • ३ सप्टेंबर २००९ - आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

From Sanjay Gandhi, Madhav Rao Scindia To Lok Sabha Speaker And 2 Chief Ministers Have Been Killed नवी दिल्ली: सीडीएस बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. या घटनेच्या निमित्ताने अनेकांना भारतातील हवाई दुर्घटनांबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. झटपट जाणून घेऊ व्हीआयपींशी संबंधित भारतातील दहा मोठ्या हवाई दुर्घटना.

१. २३ नोव्हेंबर १९६३ - जम्मू काश्मीरमध्ये पुँछ येथे भारतीय वायुदलाचे विमान कोसळले. या दुर्घटनेत वायुदलाच्या सहा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ले. जनरल बिक्रमसिंह आणि एअर व्हाइस मार्शल एरलिक पिंटो यांचा समावेश होता. 

२. ३१ मे १९७३ - काँग्रेस नेते मोहन कुमार मंगलम इंडियन एअरलाइन्स ४४० विमानातून प्रवास करत होते. विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जवळच्या पार्कर पेनमुळेच त्यांची ओळख पटविणे शक्य झाले.

३. २३ जून १९८० - काँग्रेस नेते संजय गांधी यांनी दिल्लीच्या सफदरजंग विमानतळावरुन खासगी विमानातून उड्डाण केले. ते स्वतः विमानाचे वैमानिक होते. संजय गांधी हे एक अनुभवी वैमानिक होते. पण विमानाला अपघात झाला. या अपघातात संजय गांधी यांचा मृत्यू झाला.

४. २००१ - अरुणाचल प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

५. ३० सप्टेंबर २००१ - उत्तरप्रदेशमधील मैनपुरी जिल्ह्यात काँग्रेस नेते माधवराव सिंधिया यांचा विमान अपघातात मृत्यू. ते त्यांच्या दहा आसनी खासगी विमानातून प्रवास करत होते. सिंधिया यांच्यासोबत चार पत्रकार होते. वाईट हवामानामुळे कमी झालेल्या दृश्यमानतेत प्रवास सुरू असताना विमान कोसळले. यात माधवराव सिंधिया आणि चारही पत्रकारांचा मृत्यू झाला.

६. ३ मार्च २००२ - लोकसभाध्यक्ष आणि तेलगू देसम पक्षाचे नेते जीएमसी बालयोगी यांना घेऊन जात असलेले हेलिकॉप्टर आंध्र प्रदेशमध्ये कोसळले. यात बालयोगी यांचा मृत्यू झाला.

७. सप्टेंबर २००४ - केंद्रीयमंत्री आणि मेघालय कम्युनिटी डेव्हलपमेंट मिनिस्टर सी. संगमा यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. हा अपघात गुवाहटी ते शिलाँग दरम्यानच्या प्रवासात झाला. 

८. ३१ मार्च २००५ - हरयाणाचे ऊर्जा मंत्री ओ. पी. जिंदल यांचा विमान अपघातात उत्तरप्रदेशमधील सहारनपूर जिल्ह्यात मृत्यू झाला. 

९. ३ सप्टेंबर २००९ - आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. चित्तूरच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळले. वायएस राजशेखर रेड्डी यांचा मृतदेह २७ तासांच्या शोध मोहिमेनंतर मिळाला होता.

१०. १८ ऑगस्ट १९४५ - विमान अपघातात सर्वात आधी मृत्यू झालेले भारतीय व्हीआयपी म्हणजे सुभाषचंद्र बोस. त्यांना घेऊन जात असलेल्या विमानाचा संशयास्पदरित्या अपघात झाला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी