गोव्यात राजकीय भूकंप, विरोध पक्ष नेत्यासह काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये!

कर्नाटकमध्ये वेगवान राजकीय घडामोडी सुरू असताना दुसरीकडे गोव्यातही राजकीय भूकंप झाला आहे. कारण काँग्रेसचे तब्बल १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

pramod sawant_ANI
गोव्यात राजकीय भूकंप, काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • गोव्यात भाजपने काँग्रेसचे तब्बल १० आमदार फोडले
  • गोव्यात भाजपचं सरकार आता मजबूत स्थितीत
  • गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचं केलं स्वागत

पणजी: कर्नाटकमध्ये जे घडलं तेच आता गोव्यातील राजकारणात देखील घडत आहे. कारण की, गोव्यात काँग्रेसचे तब्बल १० आमदारांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दोन तृतीयांश आमदारांनी भाजपमध्ये विलीन होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गोव्यातील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते चंद्रकांत कावळेकर यांच्या नेतृत्वात १० आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना भेटून काँग्रेस पक्ष सोडत असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी एक पत्र देखील विधानसभा अध्यक्षांना दिलं. या आमदारांमध्ये अतानासियो मोन्सेराते, जेनिफर मोन्सेराते, फ्रान्सिस सिल्वेरा, फिलिप नेरी रॉड्रिग्स, सी डियाज, विल्फ्रेड डीसा, निळकंट हलारंकार आणि इसिडोर फर्नांडीज यांचा समावेश आहे. काँग्रेसचे एक गठ्ठा दहा आमदार भाजपमध्ये आल्याने आता गोव्यात भाजपचं सरकार आणखी मजबूत झालं आहे. कारण विधानसभेत काठावर असलेल्या बहुमताची संख्या आता आणखी वाढली आहे. 

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आमदार विधानसभेत पोहचण्याआधीच विधानसभा परिसरात हजर होते. याशिवाय विधानसभेचे उपाध्यक्ष मायकल लोबो देखील तेथे हजर होते. काँग्रेसचे १० आमदारांनी पक्ष बदल केल्यानंतर आता विधानसभेत त्यांचे फक्त पाच आमदार उरले आहेत. गोव्याच्या विधानसभेत आता भाजपचे सर्वाधिक १७ आमदार, गोवा फॉरवर्ड पक्षाचे तीन, तर तीन अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे प्रत्येकी १-१ आमदार आहेत. 

 

 

काँग्रेस पक्ष सोडण्याऱ्या आमदारांमध्ये विरोधी पक्ष नेते चंद्रकांत कावळेकर यांचा देखील समावेश आहे. त्यांच्याच नेतृत्वात १० आमदारांनी राज्य विधानसभेच्या अध्यक्षांची भेट घेऊन काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय त्यांना सांगितला. यासोबतच त्यांनी वेगळा गट स्थापन करत असल्याचंही म्हटलं आहे. आमदारांचा हा आकडा काँग्रेसच्या एकूण आमदारांच्या दोन तृतीयांश एवढा आहे. यामुळे या सर्व आमदारांवर पक्ष बदलाची कायदेशीर कारवाई होणार नाही.

 

 

दरम्यान, गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर भाजपने डॉ. प्रमोद सावंत यांची गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड केली होती. पण त्यावेळी भाजपकडे संपूर्ण बहुमत नव्हतं. मात्र, त्यावेळी बरीच जुळवाजुळव करत भाजपने गोव्यात आपली सत्ता कायम राखली होती. पण त्यानंतर काही दिवसातच  महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी  (MGP)चे दोन आमदार फोडण्यात भाजप यशस्वी ठरला होता. मनोहर आजगावकर आणि दीपक पावस्कर हे दोन आमदार भाजपच्या गळाला लागले होते. त्यामुळे गोव्यातील भाजपचं सरकार काहीसं स्थिर झालं होतं. पण आता थेट विरोधी पक्षातील १० आमदार भाजपमध्ये येणार असल्याने प्रमोद सावंत यांचं सरकार निश्चिंत झालं आहे. 

 

 

२०१७ मध्ये गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. पण आता काँग्रेसचे तब्बल १० आमदार हे भाजपमध्ये गेल्याने त्यांच्याकडे फक्त ५ आमदार उरले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
गोव्यात राजकीय भूकंप, विरोध पक्ष नेत्यासह काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये! Description: कर्नाटकमध्ये वेगवान राजकीय घडामोडी सुरू असताना दुसरीकडे गोव्यातही राजकीय भूकंप झाला आहे. कारण काँग्रेसचे तब्बल १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles