HIV Positive Prisoners: तुरुंगात एकाच वेळी आढळले 10 HIV पॉझिटिव्ह कैदी

HIV positive prisoners: आझमगड कारागृहात 10 कैद्यांमध्ये एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार कारागृहात उभारण्यात आलेल्या वैद्यकीय शिबिरात याची पुष्टी झाली.

10 prisoners found together in azamgarh district jail hiv positive investigation is going on
तुरुंगात एकाच वेळी आढळले 10 HIV पॉझिटिव्ह कैदी  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • एकाच तुरुंगात आढळले एचआयव्हीचे तब्बल 10 रुग्ण
  • एचआयव्ही रुग्ण सापडल्याने तुरुंग प्रशासनात खळबळ
  • एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांबाबत होणार चौकशी

HIV Positive: आझमगड: उत्तर प्रदेशातील (Uttarpradesh) आझमगड (azamgarh) कारागृहातील एकाच वेळी 10  एचआयव्ही पॉझिटिव्ह (HIV Positive) कैदी (prisoners) आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. याबाबत माहिती देताना आझमगड जिल्ह्याचे सीएमओ म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानुसार कैद्यांची एचआयव्ही चाचणी करण्यात येत आली आहे. ज्यामध्ये आतापर्यंत एकूण 10 रुग्ण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. या कैद्यांना सामान्य कैद्यांप्रमाणे ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले, तसेच कोणत्याही कैद्याला इतर काही समस्या असतील तर त्यानुसार उपचार केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. (10 prisoners found together in azamgarh district jail hiv positive investigation is going on)

दुसरीकडे कारागृहात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने इतर कैदी मात्र तपासणीस आरोग्य कर्मचाऱ्यांचा विरोध होत असल्याचं समजलं. मात्र, तरीही कारागृह प्रशासनाच्या मदतीने आरोग्य कर्मचाऱ्यांनी कैद्यांची तपासणी केली जात आहे. त्याचा अहवाल कारागृह प्रशासन आणि सरकारला देण्यात आला आहे.

अधिक वाचा: जीवनदानासाठी हवं होतं रक्त पण नशिबी आलं दुदैव; रक्त पेढीतून दिलेल्या रक्तातून ४ मुलांना HIV ची लागण

त्याचवेळी आरोग्य विभागाने या प्रकरणाचा अहवाल कारागृह प्रशासन व शासनाला दिला आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारागृहात कैद्यांचा एचआयव्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट जेव्हा तुरुंग प्रशासनला दिला तेव्हा तिथे एकच खळबळ माजली. दरम्यान, आता या कैद्यांचा एचआयव्हीचा नेमका इतिहास शोधला जात आहे.

अधिक वाचा: देशात घटली एड्सग्रस्तांची संख्या, 10 वर्षात 17 लाख लोकांना एचआयव्हीची लागण

एचआयव्ही दोन प्रकारचा असतो

सीएमओ म्हणाले की, एचआयव्हीचे दोन प्रकारचे आहेत, ते कैद्यांमध्ये संक्रमित रक्त संक्रमणाने किंवा असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे झाले असावे, आता या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

अधिक वाचा: Viral News: धक्कादायक! एड्सबाधित काकीने रचला कट; अल्पवयीन पुतण्याशी ठेवले शारिरीक संबंध

HIV ची लक्षणे

  1. बराच काळ ताप असणे- एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या अंगात दोन ते चार आठवडे ताप असतो. रात्रीच्या वेळेस घाम येतो आणि झोप मोडते. याप्रकारचे संकेत आहे की तुमची इम्युनिटी सिस्टीम कमकुवत झाली आहे. 
  2. थकवा जाणवणे- गेल्या काही दिवसांपासून खूपच थकवा अथवा काहीही न केल्यानंतरही अशक्तपणा जाणवत असेल तर ही एचआयव्हीची प्राथमिक लक्षणे असू शकतात.
  3. घश्यामध्ये त्रास जाणवणे अथवा दुखणे- एचआयव्ही्या सुरूवातीच्या लक्षणांमध्ये पेशंटला तापासोबतच गळ्यामध्येही त्रास जाणवू लागतो. तापाआधी गळ्यामध्ये खवखव जाणवते. ज्यामुळे जेवण गिळण्यासही त्रास होतो. 
  4. सांधेदुखीचा त्रास-  या लक्षणांमध्ये तुम्हाला सांधेदुखीचाही त्रास संभवतो. हा त्रास २ ते २४ तासांपर्यंत राहू शकतो. काही लोकांना पाठीचे दुखणे तसेच ऑस्टियोपोरोसिस होण्याचीही शक्यता असते. 
  5. वजन कमी होणे- एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तींचे वजन हे लगेच कमी होत नाही तर हळूहळू कमी होते. याचा शरीराच्या सिस्टीमवर वेगाने प्रभाव पडतो आणि वजन कमी होण्यास सुरूवात होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी