Independence Day : देशातील १०८२ पोलिसांचा पदकांनी गौरव, पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील ८४ पोलीस

1082 Police personnel have been awarded Medals on the occasion of Independence Day 2022 : यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून परंपरेनुसार पोलीस पदकांची घोषणा झाली. देशातील १०८२ पोलिसांचा पदक देऊन सन्मान केला जाईल.

1082 Police personnel have been awarded Medals on the occasion of Independence Day 2022
Independence Day : देशातील १०८२ पोलिसांचा पदकांनी गौरव  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • Independence Day : देशातील १०८२ पोलिसांचा पदकांनी गौरव
 • पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील ८४ पोलीस
 • पोलीस शौर्य पदके : ३४७, महाराष्ट्रातील ४२ पोलिसांना पोलीस शौर्य पदक जाहीर

नवी दिल्ली : यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून परंपरेनुसार पोलीस पदकांची घोषणा झाली. देशातील १०८२ पोलिसांचा पदक देऊन सन्मान केला जाईल. ( 1082 Police personnel have been awarded Medals on the occasion of Independence Day  2022 ) । पोलीस

पोलीस पदकांमध्ये ३४७ शौर्य पदके आहेत. जम्मू काश्मीरच्या २०४ जवानांना त्यांच्या शौर्यासाठी पदक जाहीर झाले आहे. नक्षलवाद प्रभावीत क्षेत्रातील ८० तर ईशान्य भारतातील १४ जवानांना शौर्य पदक जाहीर झाले आहे. शौर्य पुरस्कार मिळवणार्‍यांमध्ये  केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १०९, जम्मू काश्मीर पोलीस दलाच्या १०८, सीमा सुरक्षा दलाच्या १९, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ४२, छत्तीसगड पोलीस दलाच्या १५ जवानांचा समावेश आहे. उर्वरित पोलीस जवान इतर राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे आहेत.

महाराष्ट्रातील पोलीस जवानांमध्ये माहूरदार परांजने, राजरत्न खैरनार, राजू कांडो, अविनाश कुमरे, संदीप भांड, मोतीराम माडवी, दामोदर चिंतुरी, राजकुमार भालावी, सागर मूल्लेवार, शंकर माडवी, रमेश असम, महेश सयम, साईकृपा मिरकुटे, रत्नाय्या गोरगुंडा, मनीष कलवानिया, भाऊसाहेब ढोले, संदीप मंडलिक, दयानंद महादेश्वर, जीवन उसेंडी, राजेंद्र माडवी, विलास पाडा, मनोज इसकापे, समीर शेख, मनोज गजमवार, अशोक माजी, देवेंद्र पखमोडे, हर्षल जाधव, स्वर्गीय जगदेव मांडवी, सेवाक्रम माडवी, सुभाष गोमले, रोहित गोमले, योगीराज जाधव, धनाजी होनमाने, दसरू कुरसामी, दीपक विडपी, सुरज गंजीवार, दिवंगत किशोर अत्राम, गजानन अत्राम, योगेश्वर सदमेक, अंकुश खंडाळे यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील पोलीस गुप्तचर यंत्रणेचे जॉइंट कमिशनर सुनिल कोल्हे, ठाणे शहर पोलीस दलाच्या वायरलेस विभागाचे असिस्टंट कमिशनर प्रदीप कन्नाळु, मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनवडे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. 

तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ११ पोलिसांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’

तपासात उत्कृष्ट कामगिरी  करणाऱ्या  महाराष्ट्रातील अकरा पोलिसांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ जाहीर झाले. या पुरस्काराची सुरुवात २०१८ पासून झाली. केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे ( सीबीआय) १५, मध्य प्रदेशमधून दहा पोलीस अधिकारी-कर्मचारी, उत्तर प्रदेशातून दहा पोलीस अधिकारी-कर्मचारी, केरळमधून आठ पोलीस, राजस्थानमधून आठ पोलीस , पश्चिम बंगालमधून आठ आणि उर्वरित राज्यांमधून तसेच केंद्रशासित प्रदेशातून इतर पोलीस आहेत. पुरस्कारप्राप्त अधिकाऱ्यांमध्ये २८ महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. देशभरातील एकूण १५१ पोलिसांना तपासात उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ जाहीर झाले.

विजेते : 

 1. कृष्णकांत उपाध्याय, उप पोलीस आयुक्त
 2. प्रमोद भास्करराव तोरडमल, निरीक्षक
 3. मनोज मोहन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक
 4. दिलीप शिशुपाल पवार, निरीक्षक
 5. अशोक तानाजी विरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ)
 6. अजित भागवत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ)
 7. राणी तुकाराम काळे, सहाय्यक निरीक्षक
 8. पशिखा दिपक वारे, निरीक्षक
 9. सुरेशकुमार नानासाहेब राऊत, निरीक्षक
 10. जितेंद्र बोडप्पा वनकोटी, निरीक्षक
 11. समीर सुरेश अहिरराव, निरीक्षक
 1. पोलीस शौर्य पदके : ३४७ । महाराष्ट्रातील ४२ पोलिसांना पोलीस शौर्य पदक जाहीर
 2. विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदके : ८७ । महाराष्ट्रातील ३ पोलिसांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक
 3. कौतुकास्पद सेवेसाठी पोलीस पदके : ६४८ । महाराष्ट्रातील ३९ पोलिसांना कौतुकास्पद सेवेसाठी पोलीस पदक

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी