11 डिसेंबर भारतीय भाषा उत्सव दिवस, अभिवादनाचे नवे शब्द शोधण्याची स्पर्धा

11 december bharatiya bhasha divas, ugc guidelines for bharatiya bhasha utsav to find interesting words in regional languages : भारतात रविवार 11 डिसेंबर 2022 रोजी भारतीय भाषा उत्सव दिवस (भारतीय भाषा  दिवस) साजरा होणार आहे.

11 december bharatiya bhasha divas
11 डिसेंबर भारतीय भाषा उत्सव दिवस  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • 11 डिसेंबर भारतीय भाषा उत्सव दिवस
  • अभिवादनाचे नवे शब्द शोधण्याची स्पर्धा
  • भारतीय भाषा उत्सव

11 december bharatiya bhasha divas, ugc guidelines for bharatiya bhasha utsav to find interesting words in regional languages : भारतात रविवार 11 डिसेंबर 2022 रोजी भारतीय भाषा उत्सव दिवस (भारतीय भाषा  दिवस) साजरा होणार आहे. देशातील भाषा, संस्कृती या बाबतीतल्या विविधतेची आणि संपन्नतेची देशातील नागरिकांना जाणीव व्हावी यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन अर्थात यूजीसीने देशातील सर्व विद्यापीठांना आणि विद्यापीठांशी संलग्न असलेल्या कॉलेजांना भारतीय भाषा उत्सव तसेच भारतीय भाषा  दिवस (भारतीय भाषा उत्सव दिवस) साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने भारतीय भाषा समिती स्थापन केली आहे. ही समिती देशातील सर्व भाषांमध्ये भाषा सद्भाव निर्माण व्हावा यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. या अंतर्गत भाषा उत्सव साजरा होणार आहे. मातृभाषा तसेच देशातील अधिकाधिक भाषा शिकून त्यांच्यावर पकड मिळवणे प्रगतीसाठी उपयुक्त आहे. जास्त भाषा येत असतील तर देशातील अधिकाधिक नागरिकांशी संवाद साधणे सोपे होईल. यातून सांस्कृतिक विविधता समजून घेणे सोपे होईल. वेवेगळ्या समाजवर्गातील चांगल्या गोष्टी जाणून घेऊन त्यांचा प्रगतीसाठी उपयोग करून घेणे शक्य होईल. यासाठी बहुभाषिक होणे फायद्याचे आहे. 

आधुनिक तामीळ कवी सुब्रह्मण्यम भारती यांच्या जयंतीचे निमित्त साधून 11 डिसेंबर रोजी भारतीय भाषा  दिवस साजरा करण्याचा निर्णय झाला आहे. कवी सुब्रह्मण्यम भारती यांनी स्वातंत्र्यसंग्राम सुरू असताना अनेक प्रेरणादायी देशभक्तीपर कविता आणि गाणी लिहिली होती. या त्यांच्या कार्याचा गौरव भारतीय भाषा  दिवस साजरा करून केला जाईल. 

भारतीय भाषा दिनाच्या निमित्ताने देशातील सर्व विद्यापीठांमध्ये आणि विद्यापीठांशी संलग्न असलेल्या कॉलेजांमध्ये एका अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा आहे नमस्कार, नमस्ते, प्रणाम, वणक्कम, खुरुमजरी, नोमोशकर, केम छो... या अभिवादनाच्या शब्दांना प्रत्येक भाषेत नवे पर्यायी शब्द शोधण्याची. 

स्पर्धेच्या निमित्ताने भाषा संशोधनाला नवी चालना देण्याचा प्रयत्न यूजीसी करत आहे. भाषा उत्सव साजरा करण्यासाठी विद्यापीठांमध्ये आणि कॉलेजांमध्ये लँग्वेज स्टॉल लावले जातील. या स्टॉलवर भाषा सौंदर्याशी संबंधित माहिती दिली जाईल. किमान एक नवी भारतीय भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी लँग्वेज स्टॉलच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल. 

माझी भाषा माझे हस्ताक्षर या उपक्रमांतर्गत यूजीसी विद्यार्थ्यांना आपापल्या मातृभाषेत सही करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी भाषा दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने आपापल्या संस्कृतीला अनुसरून परंपरागत कपडे परिधान करावे, असेही आवाहन यूजीसीने केले आहे. 

UGC: Bharatiya Bhasha Utsav To Be Celebrated Every 11 December

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी