Mufti Raped Minor In Madrasa: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठमधून (Meerut) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खरं तर, येथील एका मदरशात (Madrasa) मुफ्ती यांनी एका 11 वर्षांच्या निष्पाप मुलावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. मुफ्तीने सुमारे 20 वेळा त्या मुलावर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
हे प्रकरण मेरठमधील मवाना पोलीस स्टेशनमधील आहे. अल्पवयीन मुलावर अत्याचार करताना मुफ्तीला कसलीच लाज राहिली नाही. पीडित मुलाचे आई-वडील दिल्लीमध्ये राहतात.
विशेष म्हणजे, पीडित मुलगा दिल्लीतील त्याच्या घरी गेला तेव्हा मदरशातील बलात्काराचे प्रकरण उघडकीस आले. त्याने तेथील कुटुंबीयांना आपल्या सोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. पीडित मुलाने आपल्या कुटुंबीयांना सांगितले की, मुफ्ती त्याला वेगळ्या खोलीत घेऊन गेल्यानंतर क्रूर आणि घाणेरडे बोलत असतं. पीडित मुलाने सांगितले की, आरोपी इतर मुलांसोबतही असेच घृणास्पद कृत्य करतो.
हा प्रकार त्यांच्या मुलाकडून समजल्यानंतर कुटुंबीयांनी या प्रकरणाची तक्रार घेऊन मवना पोलिस ठाणे गाठून पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. मात्र, या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी मदरसा चालवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीला पकडण्यासाठी सातत्याने प्रयत्न देखील सुरू आहेत. एवढेच नाही तर पोलिसांनी पीडित मुलाचा जबाब नोंदणी आणि मेडिकलही केले आहे.
मवानाचे सीओ उदय प्रताप सिंह यांनी सांगितले की, 7 मे रोजी ठाणे मवाना येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने तक्रार दिली होती की, इक्रान नगर येथील मदरशाच्या मुफ्ती अब्दुलने त्यांच्या 11 वर्षाच्या मुलावर सुमारे 7 महिन्यांपासून बलात्कार केला होता. कुटुंबियांना याची माहिती ईदच्या वेळी झाली जेव्हा पीडित मुलगा घरी परत आला होता. दरम्यान तक्रारीनंतर आरोपी विरुद्धात तक्रार दाखल केली असून पीडित मुलाची वैद्यकीय तपासणी देखील केली गेली आहे.