11 वर्षीय मुलगा 45 मिनिटे सोसायटी लिफ्टमध्ये अडकला अन् वॉचमन मोबाइलवर गाणी ऐकण्यात होता मग्न

11 year old boy trapped in lift for 45 minutes: सोसायटीच्या लिफ्टमध्ये एक 11 वर्षीय मुलगा 45 मिनिटे अडकल्याची घटना समोर आली आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो (Photo: iStock) 

Child trapped in lift: एक 11 वर्षीय मुलगा तब्बल 45 मिनिटे सोसायटीच्या लिफ्टमध्ये अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ग्रेटर नोएडा येथील ग्रेनो वेस्टमधील एका सोसायटीत ही घटना घडली. पॅरामाऊंट इमोशन्स असं सोसायटीचं नाव आहे. येथील एस टॉवरमधील लिफ्टमधून 11 वर्षीय चिमुकला लिफ्टने खाली उतरत होता त्यावेळी लिफ्ट अचानक बंद पडली. बराचवेळ या मुलाचा तपास केल्यानंतर कुटुंबीयांची नजर लिफ्टवर गेली आणि तेव्हा हा मुलगा लिफ्टमध्ये अडकल्याचं समोर आलं. धक्कादायक म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी गार्ड हा मोबाइलवर गाणी ऐकत असल्याचं उघड झालं. (11 year old boy stuck in noida society lift for 45 minutes and same time watchman busy to listen songs read in marathi)

लिफ्टमध्ये अडकलेल्या मुलाला सुखरुप बाहेर काढण्यात आले. मात्र, या घटनेने एकच खळबळ उडाली. सोसायटीमधील रहिवाशांनी सुद्धा खूपच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस कर्मचारी दाखल झाले आणि त्यांनी संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.

हे पण वाचा : तर चुकूनही पिऊ नका नारळ पाणी

लिफ्टमधील सीसीटीव्ही फूटेज हे गार्डच्या रूममध्ये दिसते आणि अलार्म सुद्धा वाजतो. मात्र, गार्ड आपल्या रूममध्ये बसून कानात ईयर फोन लावून गाणी ऐकण्यात मग्न होता. त्यामुळे त्याला अलार्म ऐकू आला नाही आणि लिफ्टमधील सीसीटीव्ही फूटेजकडेही त्याचे लक्ष नव्हते. 

हे पण वाचा : 'ही' आहेत भारतातील सर्वात सुंदर गावे, तुम्ही पाहिली का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय हे आपल्या कुटुंबासोबत सोसायटीतील टॉवरमध्ये सहाव्या मजल्यावर राहतो. मंगळवारी रात्री त्यांचा 11 वर्षीय मुलगा आपल्या मित्राला भेटण्यासाठी त्याच टॉवरमधील 16 व्या मजल्यावर गेला होता. बराच वेळ मुलगा घरी परतला नाही तेव्हा अजय यांनी मुलाच्या मित्राच्या घरी फोन केला. तेव्हा पाच मिनिटांपूर्वीच तुमचा मुलगा घरातून गेला असे सांगण्यात आले. मात्र, अजय यांचा मुलगा घरी परतलाच नाही त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली.

बराच वेळ शोधल्यानंतर कुटुंबीयांचं लक्ष लिफ्टकडे गेलं. तेव्हा लिफ्ट 15 आणि 16 व्या मजल्यावर अडकली असल्याचं समोर आलं. त्यानंतर सोसायटीच्या मेन्टेनन्स टीमला बोलवण्यात आले आणि जवळपास 45 मिनिटांनी या 11 वर्षीय मुलाला लिफ्टमधून बाहेर काढण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी