12 Rajya Sabha MPs Suspended: हिवाळी अधिवेशनातून काँग्रेस, शिवसेना, टीएमसी, सीपीआय आणि सीपीएमचे 12 राज्यसभा खासदार निलंबित

12 Rajya Sabha MPs Suspended: विरोधी पक्षांच्या 12 खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.

12 Rajya Sabha MPs suspended for rest of Winter Session for ruckus in August
12 Rajya Sabha MPs Suspended 
थोडं पण कामाचं
  • संसदेच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातून विरोधी पक्षांच्या 12 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
  • गेल्या पावसाळी अधिवेशनात झालेल्या गदारोळामुळे या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
  • संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी उपसभापती हरिवंश यांच्या परवानगीने याबाबतचा ठराव मांडला,

12 Rajya Sabha MPs Suspended: संसदेच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातून विरोधी पक्षांच्या 12 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

निलंबित करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) इलामाराम करीम, काँग्रेसच्या फूल देवी नेताम, छाया वर्मा, रिपून बोरा, राजमणी पटेल, सय्यद नासीर हुसेन, अखिलेश प्रताप सिंग, डोला सेन आणि तृणमूल काँग्रेसच्या शांता छेत्री यांचा समावेश आहे.  प्रियांका चतुर्वेदी आणि शिवसेनेचे अनिल देसाई आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे विनय विश्वम यांचा समावेश आहे.  (12 Rajya Sabha MPs suspended for rest of Winter Session for ruckus in August) 
)

गेल्या पावसाळी अधिवेशनात झालेल्या गदारोळामुळे या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी उपसभापती हरिवंश यांच्या परवानगीने याबाबतचा ठराव मांडला, जो विरोधी पक्षांच्या गदारोळात सभागृहाने मंजूर केला. राज्यसभेतून निलंबित करण्यात आल्यावर शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी आमची बाजू जाणून न घेता कारवाई करण्यात आल्याचे म्हटले आहे.

निलंबनावर खासदार काय म्हणाले?

प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, तुम्ही सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यास लक्षात येईल की पुरुष मार्शल महिला खासदारांना मारहाण करत आहेत. हे सगळं एकीकडे आणि तुमचा निर्णय दुसरीकडे? हे कसले असंसदीय वर्तन आहे?

काँग्रेस खासदार छाया वर्मा म्हणाल्या की, हे निलंबन अयोग्य आणि अन्यायकारक आहे. इतर पक्षांच्या अनेक सदस्यांनीही गोंधळ घातला मात्र सभापतींनी मला निलंबित केले. त्यांच्याकडे प्रचंड बहुमत असल्याने पंतप्रधान मोदी त्यांना पाहिजे ते करत आहेत.

काँग्रेसचे खासदार रिपुन बोरा म्हणाले की, हे पूर्णपणे अलोकतांत्रिक आहे; लोकशाही आणि संविधानाची हत्या झाली आहे. आम्हाला सुनावणीची संधी देण्यात आलेली नाही. हा एकतर्फी, पक्षपाती, सूडबुद्धीचा निर्णय आहे. विरोधी पक्षांशी चर्चा करण्यात आली नाही.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत झालेल्या गदारोळात  धक्काबुक्की आणि सभागृहाच्या शिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचा आरोप झाल्यानंतर राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली होती. समितीच्या शिफारशींच्या आधारे आज या खासदारांवर कारवाई करण्यात आली. संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून ते 23 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी