12 वर्षांच्या मुलावर रेप, आरोपी उलेमा फरार

12 years old boy raped by ulema in delhi madrasa sarai rohilla : एका धक्कादायक घटनेत 12 वर्षांच्या मुलावर रेप झाला. या प्रकरणातील आरोपी उलेमा फरार आहे.

crime news
12 वर्षांच्या मुलावर रेप  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • 12 वर्षांच्या मुलावर रेप
  • आरोपी उलेमा फरार
  • एफआयआर नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला

12 years old boy raped by ulema in delhi madrasa sarai rohilla : एका धक्कादायक घटनेत 12 वर्षांच्या मुलावर रेप झाला. या प्रकरणातील आरोपी उलेमा फरार आहे. रेपची घटना दिल्लीतील सराय रोहिल्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मदरशात घडली. या प्रकरणी एफआयआर नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

मुलगा मदरशात वास्तव्यास होता. तिथेच शिकत होता. उलेमाने या परिस्थितीचा गैरफायदा घेतला. अनेक दिवसांपासून उलेमा मुलावर रेप करत होता. मुलगा भीतीपोटी याबाबत कोणालाही बोलत नव्हता. मात्र मदरशातून काही दिवसांच्या सुटीवर तो घरी गेला होता. त्यावेळी घरात असूनही मुलगा सतत उदास बसून होता असे घरच्यांना जाणवले. घरच्यांनी वारंवार चौकशी केली त्यावेळी मुलाने उलेमा करत असलेल्या कृत्याबाबतची माहिती दिली. यानंतर घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. 

मुलगा मदरशात राहून शिक्षण घेत होता. या काळात दर दोन ते तीन दिवसांनी उलेमा मुलाच्या मदरशातील खोलीत जात होता. तिथून मुलाला उचलून स्वतःच्या खोलीत न्यायचा आणि त्याला काही तरी खाऊ घालायचा. यानंतर मुलाला झोप यायची. मुलगा बेशुद्ध झाला की त्याच्यावर रेप केला जात होता. रेप केल्यानंतर उलेमा मुलाला बेशुद्धावस्थेतच त्याच्या खोलीत नेऊन ठेवून देत होता. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. प्रकरण उघड होताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

उत्तर दिल्ली विभागाचे डीसीपी सागर सिंह कलसी यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले. आरोपी मोहम्मद इसरान फरार आहे. या फरार आरोपीला शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे डीसीपी म्हणाले.

तिशीनंतर प्रेग्नेंट होण्यासाठी सोप्या टिप्स

या 7 गोष्टी पती किंवा बॉयफ्रेंड आपल्या पार्टनरपासून लपवतात

बलात्कार म्हणजे काय? रेप म्हणजे काय?

व्यक्तीच्या परवानगीशिवाय अथवा बळजबरीने लैंगिक संबंध प्रस्थापित करणे म्हणजे बलात्कार (रेप). लैंगिक अत्याचार हा कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे.  जर बलात्कार एकापेक्षा जास्त व्यक्तींनी केला तर मग त्याला 'सामूहिक बलात्कार' (गँग रेप) म्हणतात. बलात्कार (रेप) हीन अपराधांच्या श्रेणीत येतो ज्याची शिक्षा दीर्घकालीन तुरुंगवास, सक्तमजुरी, जन्मठेप, मरेपर्यंत फाशी यापैकी एखादी असू शकते. बलात्काराच्या प्रकरणात काही वेळा गुन्हेगाराला तुरुंगवास आणि दंड अशी दुहेरी शिक्षा केली जाते. 

दिल्लीत मदरशात झालेल्या रेप प्रकरणात अल्पवयीन असलेल्याचे शोषण झाले आहे. या प्रकरणात आरोपीला कोर्टात दोषी आढळल्यास गंभीर स्वरुपाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. पण सध्या आरोपी फरार आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी