Punjab Corona : एअर इंडियाच्या विमानात झाला कोरोनाचा 'स्फोट', इटलीहून आलेल्या विमानातून १२५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

Punjab corona पंजाबमध्ये राजकीय सभा चालू असताना कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान अमृतसरहून एक मोठी बातमी समोर येत आहे. इटलीहून आलेल्या एअर इंडियाच्या एका विमानातून १२५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.

Multibagger Stock
थोडं पण कामाचं
  • एअर इंडियाच्या एका विमानातून १२५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
  • इटलीहून आलेले विमान अमृतसरमध्ये पोहोचले आणि त्यात १७९ प्रवासी होते.
  • सध्या पंजाबमध्ये कोरोना लागण होण्याचे प्रमाण हे ६

Punjab corona : अमृतसर : पंजाबमध्ये(punjab) राजकीय सभा चालू असताना कोरोनाची तिसरी लाट (corona third wave) येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान अमृतसरहून (amritsar) एक मोठी बातमी समोर येत आहे. इटलीहून (italy) आलेल्या एअर इंडियाच्या (air india) एका विमानातून १२५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) निघाले आहेत. (125 passengers of an international chartered flight from Italy have tested positive for Covid-19 on arrival at Amritsar airport)

अमृतसर विमानतळाचे संचालक व्ही.के सेठ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इटलीहून आलेले विमान अमृतसरमध्ये पोहोचले आणि त्यात १७९ प्रवासी होते. त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर १२५ प्रवाशांना कोरोना झाल्याचे निष्पण्ण झाले आहे.  

तिसर्‍या लाटेचा धोका
 

सध्या पंजाबमध्ये कोरोना लागण होण्याचे प्रमाण हे ६ टक्के इतके आहे. त्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती रोखण्यासाठी राज्य सक्षम आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. परंतु नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, लसच कोरोनापासून लढण्यासाठी मोठी शक्ती आहे असे प्रशासनाने म्हटले आहे. 


चंडीगढमध्ये कोरोनाचा कहर

तर दुसरीकडे पंजाब आणि चंडीगढमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. चंडीगढच्या मेडिकल कॉलेजमध्ये १९७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात ८८ डॉक्टरांचा समावेश आहे. तीन दिवसांपोर्वी १४७ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली होती. बहुतांश रुग्णांची कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला होता. सुदैवाने यात एकाही रुग्णाची तब्येत गंभीर नाही. सर्व रुग्णांना कोरोनाची हलकी लक्षेण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

ओमिक्रॉनचे संकट

कोरोनाचा कहर सुरू असताना ओमिक्रॉनचे संकटही वाढताना दिसत आहे. तज्ञांनी यापूर्वीच ओमिक्रॉनवरून चिंता व्यक्त केली होती. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये ओमिक्रॉनमुळे संटक वाढण्याची भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी