tigers death : भारतात एका वर्षात १२६ वाघांचा मृत्यू

126 tigers death in a year in India : भारतात २०२१ या एका वर्षात १२६ वाघांच्या मृत्यूची नोंद झाली. मृत्यूची कारणे वेगवेगळी आहेत. चिंतेची बाब म्हणजे गेल्या दहा वर्षांत सर्वाधिक वाघांचा मृत्यू याच वर्षात म्हणजेच २०२१ मध्ये झाला

126 tigers death in a year in India
tigers death : भारतात एका वर्षात १२६ वाघांचा मृत्यू 
थोडं पण कामाचं
  • tigers death : भारतात एका वर्षात १२६ वाघांचा मृत्यू
  • गेल्या दहा वर्षांत सर्वाधिक वाघांचा मृत्यू
  • राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) यांनी प्रसिद्ध केलेली आकडेवारी

126 tigers death in a year in India : नवी दिल्ली : भारतात २०२१ या एका वर्षात १२६ वाघांच्या मृत्यूची नोंद झाली. मृत्यूची कारणे वेगवेगळी आहेत. चिंतेची बाब म्हणजे गेल्या दहा वर्षांत सर्वाधिक वाघांचा मृत्यू याच वर्षात म्हणजेच २०२१ मध्ये झाला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) यांनी ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

आसाममध्ये घडली विचित्र घटना, शेळीनं मानवी चेहरा असलेल्या पिल्लांना दिला जन्म

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण २०१२ पासून देशातील वाघांच्या मृत्यूची आकडेवारी सार्वजनिकरित्या जाहीर करत आहे. तसेच वाघांची गणना करुन त्याची नोंद ठेवत आहे. प्राधिकरणाने केलेल्या २०१८च्या गणनेनुसार भारतात २ हजार ९६७ वाघ आढळले. भारतात २०१६ मध्ये १२१ वाघांचा मृत्यू झाला होता. यानंतर २०२१ मध्ये १२६ वाघांच्या मृत्यूची नोंद झाली. वाघांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे प्राणीप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. 

वाघांची राज्यनिहाय आकडेवारी

  1. मध्य प्रदेश - ५२६ वाघ - ४२ वाघांचा मृत्यू
  2. महाराष्ट्र - ३१२ वाघ - २६ वाघांचा मृत्यू
  3. कर्नाटक - ५२४ वाघ - १५ वाघांचा मृत्यू
  4. उत्तर प्रदेश - १७३ वाघ - ९ वाघांचा मृत्यू

वाघाचे कातडे, वाघनखे आणि वाघाचे दात मिळविण्यासाठी वाघांची शिकार होते. तर काही वेळा मानवी वस्तीला धोका जाणवू लागल्यामुळे शिकाऱ्यांच्या मदतीने वाघांना ठार केले जाते. काही वाघांचा अपघाती मृत्यू होतो तर काही वाघांचा नैसर्गिकरित्या मृत्यू होतो. माणसाच्या भौतिक प्रगतीसाठी जगभर जंगलांवर अतिक्रमण सुरू आहे. यामुळे वाघासह अनेक वन्यप्राण्यांच्या जगण्यावर गदा आली आहे. ही परिस्थिती फक्त भारतातच नाही तर कमी जास्त प्रमाणात जगातील जवळपास सर्व देशांमध्ये आहे. यामुळे भारतात एका वर्षात मोठ्या संख्येने वाघांचा मृत्यू होण्यामागील कारणांचा सखोल तपास व्हायला हवा; अशी मागणी प्राणीप्रेमी करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी