1269 tomato on one plant : एका झाडावर १२६९ चेरी टॉमेटो उगवले आहेत. ही चकीत करणारी घटना इंग्लंडमध्ये घडली आहे. हर्टफोर्डशायरमधील शेतकरी डग्लस स्मिथ यांच्या शेतातील एका झाडावर १२६९ चेरी टॉमेटो उगवले आहेत. हा एक विश्वविक्रम असल्यामुळे त्याची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'च्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे.
डग्लस स्मिथ हे टोमॅटो शेतीच्या क्षेत्रात सतत संशोधन करत असतात. याआधी डग्लस स्मिथ यांच्या शेतातील एका झाडावर ४८८ चेरी टॉमेटो उगवले होते. नंतर त्यांच्या शेतातील एका झाडावर ८३९ चेरी टॉमेटो उगवले होते. या दोन्ही प्रयोगांना मागे टाकणारा प्रयोग त्यांनी यशस्वी केला आणि एका झाडावर १२६९ चेरी टॉमेटो उगवले.
हॉर्टीकल्चर करणे डग्लस स्मिथ यांना आवडते. टोमॅटो शेतीसाठी हॉर्टीकल्चर तंत्राचा वापर करून डग्लस स्मिथ यांनी विश्वविक्रम केला आहे. हॉर्टीकल्चर तंत्राच्या मदतीने जगातील सर्वोत्तम शेतकरी होण्याची त्यांची इच्छा आहे. शेती करण्याआधी भरपूर अभ्यास करणे, संशोधन करणे आणि कमीत कमी जागेत शेती करून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी प्रयोग करणे हा डग्लस स्मिथ यांचा छंद झाला आहे. एका झाडावर १२६९ चेरी टोमॅटोचे उत्पादन घेऊन विश्वविक्रमाची नोंद केली तरी डग्लस स्मिथ थांबू इच्छीत नाही. शेती क्षेत्रातले संशोधन यापुढेही सुरू ठेवणार, असे डग्लस स्मिथ यांनी सांगितले.