सूरतमध्ये भीषण अपघात, डंपरने १८ जणांना चिरडले, १३ जणांचा मृत्यू 

Surat Accident: गुजरातमधील सूरत येथे एका अनियंत्रित डंपरने रस्त्यावर झोपलेल्या १८ मजुरांना चिरडले. ज्यामध्ये १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Surat road_accident
सूरतमध्ये भीषण अपघात, डंपरने १८ जणांना चिरडले, १३ जणांचा मृत्यू   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • सुरतमध्ये भीषण अपघात, १८ जणांना चिरडले
  • रस्त्याजवळ झोपलेल्या १८ पैकी १३ मजुरांचा मृत्यू
  • डंपर अनियंत्रित झाल्याने अपघात झाल्याचं आलं समोर

सूरत: गुजरातमधील सूरत येथे एका भयंकर  अपघातात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सूरत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कीम रोडवर १८ मजूर झोपले होते. त्याचवेळी रात्रीच्या सुमारास एक अनियंत्रित डंपर चालकाने या सर्वांना चिरडले. अपघातातील सर्व बळी हे राजस्थानमधील रहिवासी असल्याची माहिती मिळते आहेत. दरम्यान जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच सर्व मृतदेह हे  पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले आहेत. काल रात्री १२ वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार डंपर चालक हा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत असतानाच हा अपघात झाला असल्याचं समजतं आहे. 

पोलिसांचे म्हणणे आहे की, सर्व जखमींवर उत्तम उपचार होणं ही पहिली प्राथमिकता आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते याची चौकशी केली जाईल. आत्ता असे दिसते आहे की, डंपर चालक निष्काळजीपणाने गाडी चालवत असल्यानेच आहे हा अपघात झाला आहे. दरम्यान, यावेळी डंपरमध्ये  कोणत्याही प्रकारचे यांत्रिकी समस्या उद्भवली होती का? हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. 

नुकसान भरपाईची घोषणा

राजस्थानचे सीएम अशोक गहलोत म्हणाले की, राजस्थानमधील अनेक कामगारांचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समजल्यानंतर मी खूपच दु:खी झालो. कारण जेव्हा हे मजूर सूरतमध्ये रस्त्याजवळ झोपलेले होते तेव्हाच त्यांना ट्रकने चिरडलं. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करतो. तसेच राजस्थान सरकारने मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार देण्याची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती पीएमओने दिली आहे. 

दरम्यान, या अपघाताबाबत पंतप्रधान मोदींनी देखील दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी याबाबत ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, सूरतमध्ये झालेला ट्रक अपघाताची घटना खूपच दु:खद आहे. या अपघातात आपल्या व्यक्तीला गमवणाऱ्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. प्रार्थना करतो की, जखमी लवकरात लवकर बरे व्हावे! यासह केंद्र सरकारने मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार देण्याची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती पीएमओने दिली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी