कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट, महाराष्ट्रातील परिस्थिती काय? 

corona positive patients: देशात मागील २४ तासात १३१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात १३,२०३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण १,०६,६७,७३६ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 

corona patients
कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?   |  फोटो सौजन्य: AP, File Image

थोडं पण कामाचं

  • देशातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट
  • देशात आतापर्यंत कोरोना १ कोटी ६ लाखांहून अधिक लोकांना लागण
  • गेल्या २४ तासात देशात १३१ रुग्णांचा मृत्यू

मुंबई: Coronavirus india total cases 25 january 2021: देशात गेल्या २५ तासात कोरोनाचे १३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १३ हजारांच्या जवळपास कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसात रुग्णांच्या संख्येत देखील घट होत आहे. तसेच अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी होत आहे. गेल्या २४ तासात देशभरात १३,२९८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

दरम्यान, आतापर्यंत १ कोटी ६ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासात देशात १३,२०३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. (Corona Positive) तर देशात १३१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Corona Patient Death) सध्या देशभरात १ लाख ८४ हजार अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patients)आहेत. 

आतापर्यंत देशात एकूण १ लाख ५३ हजाराहून अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा १ कोटी ६ लाखांच्या पुढे गेलेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात एकूण १,०६,६७,७३६ रुग्ण सापडले आहेत. (India total corona patients) त्यापैकी १,५३,४७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण:

S. No. Name of State/UT Active Cases* Discharged* Deaths*
1 Andaman and Nicobar Islands 23 4908 62
2 Andhra Pradesh 1476 878387 7147
3 Arunachal Pradesh 18 16745 56
4 Assam 2323 213591 1078
5 Bihar 2317 254991 1479
6 Chandigarh 136 20248 334
7 Chhattisgarh 4943 288066 3617
8 Dadra and Nagar Haveli and Daman and Diu 6 3386 2
9 Delhi 1741 621375 10808
10 Goa 824 51335 761
11 Gujarat 4665 250056 4376
12 Haryana 1511 262682 3010
13 Himachal Pradesh 436 55801 973
14 Jammu and Kashmir 1103 120987 1929
15 Jharkhand 821 116402 1063
16 Karnataka 7529 916325 12197
17 Kerala 73121 813550 3607
18 Ladakh 65 9493 129
19 Lakshadweep 59 0 0
20 Madhya Pradesh 4171 245697 3789
21 Maharashtra 46057 1912264 50785
22 Manipur 201 28416 369
23 Meghalaya 111 13475 146
24 Mizoram 53 4289 9
25 Nagaland 103 11885 88
26 Odisha 1251 331144 1905
27 Puducherry 288 37927 645
28 Punjab 2256 164119 5555
29 Rajasthan 3147 310747 2758
30 Sikkim 127 5811 133
31 Tamil Nadu 4904 817520 12316
32 Telengana 3234 288577 1590
33 Tripura 32 32922 391
34 Uttarakhand 1725 92284 1631
35 Uttar Pradesh 7082 583014 8617
36 West Bengal 6323 551665 10115
Total# 184182 10330084 153470

देशात आतापर्यंत १,०३,३०,०८४ रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या १,८४,१८२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रात नेमकी स्थिती काय?

राज्यात मागील २४ तासात २,७५२ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता २०,०९,१०६ एवढी झाली आहे. तर काल एका दिवसात १,७४३ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १९,१२,२६४ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

राज्यात एकूण ४६,०५७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, काल एका दिवसात ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ५०,७८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी