Vaccination in India भारतात १३६.६६ कोटींपेक्षा जास्त लसीकरण

136.66 cr vaccine doses have been administered in India :भारतात १३६.६६ कोटींपेक्षा जास्त लसीकरण झाले. देशात १ अब्ज ३६ कोटी ६६ लाख ५ हजार १७३ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. 

136.66 cr vaccine doses have been administered in India
Vaccination in India भारतात १३६.६६ कोटींपेक्षा जास्त लसीकरण 
थोडं पण कामाचं
  • Vaccination in India भारतात १३६.६६ कोटींपेक्षा जास्त लसीकरण
  • देशात ८४ हजार ५६५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • भारताचा कोरोना रिकव्हरी रेट ९८.३८ टक्के

136.66 cr vaccine doses have been administered in India : नवी दिल्ली : भारतात १३६.६६ कोटींपेक्षा जास्त लसीकरण झाले. देशात १ अब्ज ३६ कोटी ६६ लाख ५ हजार १७३ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. 

break-up of the cumulative figure as per the provisional report till 7 am today (18 DEC 2021) include:

HCWs

1st Dose

1,03,86,103

2nd Dose

96,37,329

FLWs

1st Dose

1,83,83,832

2nd Dose

1,67,56,352

Age Group 18-44 years

1st Dose

48,50,44,794

2nd Dose

28,85,44,859

Age Group 45-59 years

1st Dose

19,11,40,425

2nd Dose

13,85,69,309

Over 60 years

1st Dose

11,94,46,163

2nd Dose

8,86,96,007

Total

1,36,66,05,173

 

देशात ८४ हजार ५६५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ही ५६९ दिवसांतील सर्वात कमी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. देशात आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी ०.२४ टक्के रुग्णच अॅक्टिव्ह आहेत.

भारताचा कोरोना रिकव्हरी रेट ९८.३८ टक्के आहे. हा देशात कोरोना संकटाला सुरुवात झाल्यापासूनचा सर्वोत्तम रिकव्हरी रेट आहे. मागील २४ तासांत देशात ७ हजार १४५ नवे कोरोना रुग्ण आढळले. तसेच मागील २४ तासांमध्ये देशातील कोरोना रुग्णांपैकी ८ हजार ७०६ जण बरे झाले. 

देशाचा डेली पॉझिटिव्हीटी रेट ०.५७ टक्के आहे. सलग ७५ दिवसांपासून देशाचा डेली पॉझिटिव्हीटी रेट २ टक्क्यांपेक्षा कमी आहे. देशाचा वीकली पॉझिटिव्हीटी रेट ०.६२ टक्के आहे. सलग ३४ दिवसांपासून देशाचा वीकली पॉझिटिव्हीटी रेट १ टक्क्यापेक्षा कमी आहे. आतापर्यंत देशात ६६.२८ कोटींपेक्षा जास्त कोरोना चाचण्या झाल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी