चांगली बातमी... अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाखांहून देखील कमी

corona positive patients: देशात मागील २४ तासात १६२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात १३,८२३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण १,०५,९५,६६० पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 

corona patients
कोरोना रुग्ण संख्या  |  फोटो सौजन्य: AP, File Image

थोडं पण कामाचं

  • देशातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट
  • देशात आतापर्यंत कोरोना १ कोटी ५ लाखांहून अधिक लोकांना लागण  
  • गेल्या २४ तासात देशात १६२ रुग्णांचा मृत्यू

मुंबई: Coronavirus india total cases 20 january 2021: देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे १६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १३ हजारांच्या जवळपास कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या अनेक दिवसांच्या तुलनेत मृतांचा आकडा कमी झाला आहेत. तसेच अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत देखील मोठी घट झाली आहे. गेल्या २४ तासात देशभरात १६,९८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

दरम्यान, आतापर्यंत १ कोटी ५ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासात देशात १३,८२३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. (Corona Positive) तर देशात १६२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Corona Patient Death) सध्या देशभरात १ लाख ९७ हजार अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patients)आहेत. 

आतापर्यंत देशात एकूण १ लाख ५२ हजाराहून अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा १ कोटी ५ लाखांच्या पुढे गेलेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात एकूण १,०५,९५,६६० रुग्ण सापडले आहेत. (India total corona patients) त्यापैकी १,५२,७१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण:

S. No. Name of State/UT Active Cases* Discharged* Deaths*
1 Andaman and Nicobar Islands 30 4897 62
2 Andhra Pradesh 1660 877443 7142
3 Arunachal Pradesh 52 16707 56
4 Assam 2728 213084 1075
5 Bihar 3241 253289 1461
6 Chandigarh 185 20080 330
7 Chhattisgarh 5932 284848 3575
8 Dadra and Nagar Haveli and Daman and Diu 9 3380 2
9 Delhi 2334 619723 10764
10 Goa 862 50952 756
11 Gujarat 5967 246516 4369
12 Haryana 1837 261751 2993
13 Himachal Pradesh 584 55468 967
14 Jammu and Kashmir 1103 120512 1923
15 Jharkhand 1147 115683 1057
16 Karnataka 7884 913012 12181
17 Kerala 70481 783393 3506
18 Ladakh 79 9454 129
19 Lakshadweep 21 0 0
20 Madhya Pradesh 5732 242691 3763
21 Maharashtra 49615 1894839 50523
22 Manipur 235 28298 367
23 Meghalaya 133 13433 144
24 Mizoram 67 4258 9
25 Nagaland 112 11866 88
26 Odisha 1613 330051 1902
27 Puducherry 297 37766 643
28 Punjab 2412 163009 5516
29 Rajasthan 4304 308547 2752
30 Sikkim 156 5765 131
31 Tamil Nadu 5487 814098 12281
32 Telengana 3919 286893 1583
33 Tripura 38 32907 391
34 Uttarakhand 1992 91428 1619
35 Uttar Pradesh 8172 580482 8584
36 West Bengal 6781 549218 10074
Total# 197201 10245741 152718

देशात आतापर्यंत १,०२,४५,७४१ रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या १,९७,२०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रात नेमकी स्थिती काय?

राज्यात मागील २४ तासात २,२९४ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १९,९४,९७७ एवढी झाली आहे. तर काल एका दिवसात ४,५१६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १८,९४,८३९ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

राज्यात एकूण ४९,६१५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, काल एका दिवसात ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ५०,५२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी