दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १३ ऑक्टोबर २०१९: राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला ते टीम इंडियाचा विजय

Headlines of the 13th October 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Daily news
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १३ ऑक्टोबर २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १३ ऑक्टोबर २०१९:  आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... नुकतीच झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेची. मागाठाणे येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपवर टीका केली आहे. दुसरी महत्त्वाची बातमी, राहुल गांधी यांची. राहुल गांधी हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आले होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारला जीएसटी, नोटाबंदी, शेतकऱ्यांचे मुद्दे, पीएमसी बँक घोटाळा यावरून घेरलं आहे. तिसरी महत्त्वाची बातमी, नरेंद्र मोदींनी पवारांची खिल्ली उडवली आहे. काही दिवसांपासून पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यातच उल्लेख करत मोदींनी त्यांची नक्कल केली. चौथी महत्त्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यात आले होते. यावेळी त्यांनी जम्मू काश्मीरच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. पाचवी आनंदाची बातमी क्रिकेट क्षेत्रातली आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात टीम इंडियानं 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या सविस्तर बातम्या वाचूया.

  1. हीच ती वेळ, म्हणजे गेली पाच वर्ष नव्हता का यांना वेळ?, राज ठाकरेंचा शिवसेनेला टोलाः महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची दहिसरमध्ये येथे सभा पडली. या सभेत राज ठाकरे यांनी भाजप शिवसेना सरकारवर जोरदार तीव्र शब्दांत टीका केली आहे. बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  2. परदेशात जाऊन मोदी देश तोडण्याची भाषा करतात: राहुल गांधी : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांची चांदिवलीमध्ये सभा पार पडली. यावेळी राहुल गांधींनी भाजपवर टीका केली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. पहिल्याच सभेत पंतप्रधान मोदींनी उडवली शरद पवारांची खिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आहेत. पंतप्रधान मोदींची पहिली सभा जळगावात झाली. यावेळी मोदींनी शरद पवार यांचा एका सभेतील व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचा उल्लेख करत खिल्ली उडवली. बातमी संपूर्ण वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. [VIDEO] जम्मू-काश्मीर केवळ जमीन नाही तर भारताचं मस्तक: मोदी :  विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज महाराष्ट्रात जाहीर सभा पार पडली आहे. मोदींची जळगावातील संपूर्ण सभा पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा आणि बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  5. IND vs SA 2nd Test: पुण्यात विराट सेनेचा विजय, दक्षिण आफ्रिकेचा पराभव :  भारतानं दक्षिण आफ्रिकेला पुणे टेस्टमध्ये एक डाव आणि 137 धावांच्या अंतरांनी मात करत तीन मॅचच्या सीरिजमध्ये 2-0 आघाडी घेतली आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी