नौदल हेरगिरी प्रकरणी गुजरातमधून एकाला अटक

14 arrested in naval espionage case नौदलात हेरगिरी केल्याप्रकरणी एनआयएने १४ जणांना अटक करुन त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. आरोपींमध्ये इमरान गितेली याचा समावेश आहे.

14 arrested in naval espionage case
नौदल हेरगिरी प्रकरणी गुजरातमधून एकाला अटक 

थोडं पण कामाचं

  • नौदल हेरगिरी प्रकरणी गुजरातमधून एकाला अटक
  • अटक केलेली व्यक्ती गुजरातच्या गोधराची रहिवासी
  • इमरान गितेली अटक केलेल्याचे नाव

नवी दिल्ली: नौदलात हेरगिरी केल्याप्रकरणी एनआयएने (National Investigation Agency  - NIA) १४ जणांना अटक करुन त्यांच्याविरोधात आरोपपत्र (charge sheet) दाखल केले. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये गुजरातच्या गोधरा (godhra) येथील एक रहिवासी आहे. इमरान गितेली (imran giteli) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा प्रमुख आरोपींपैकी एक आहे. (14 arrested in naval espionage case)

इमरान गितेली रिक्षा चालक आहे. मात्र तो पाकिस्तानच्या (pakistan) आयएसआय (ISI) या गुप्तचर संस्थेसाठी काम करतो आणि पाकिस्तानमध्ये त्याचा कपड्यांचा व्यापार आहे. त्याचे काही नातलग आजही पाकिस्तानमध्ये आहेत, अशी माहिती एनआयएने दिली.

एनआयएने इमरानच्या मागील काही महिन्यांतील आर्थिक व्यवहारांच्या नोंदी तपासल्या. यात पाकिस्तानमधून आलेल्या पैशांच्या नोंदी दिसत आहेत. या प्रकरणात इमरानला समाधानकारक उत्तर देणे जमलेले नाही. इमरानला विशाखापट्टणम येथील नौदल तळाची हेरगिरी केल्याप्रकरणी अटक झाली आहे. त्याच्या घरातून एनआयएच्या टीमने अनेक डिजिटल डॉक्युमेंट जप्त केली. जप्तीची कारवाई केल्यानंतर एनआयएने इमरानला थेट दिल्लीत नेले. तिथेच त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.

३७ वर्षांच्या इमरानच्या बँक खात्याचे स्टेटमेंट एनआयएच्या ताब्यात आहे. या स्टेटमेंट आधारे तपास पथकाने इमरानवर प्रश्नांची  तोफ डागली. इमरानला अनेक प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे देणे शक्य झाले नाही. 

इमरान हा आयएसआयच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर हेरगिरी करणाऱ्या टीमचा सदस्य होता. भारतात (India) त्याच्याकडे नौदलाच्या (Indian Navy) वेगवेगळ्या जहाजांची माहिती मिळवणे, या जहाजांची क्षमता, त्यांचे सध्याचे तसेच पुढील काही दिवसांतले लोकेशन अशी माहिती पाकिस्तानला पुरवण्याचे काम होते. मात्र त्याला पकडण्यात एनआयए यशस्वी झाली. 

इमरान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी नेमकी कोणती माहिती पाकिस्तानला पुरवली त्याचा तपास सुरू आहे. एनआयए या संदर्भाली महत्त्वाची माहिती न्यायालयात बंदीस्त लिफाफ्यात सादर करण्याची शक्यता आहे. तसेच नौदलाच्या उच्चाधिकाऱ्यांना हेरगिरी प्रकरणाची माहिती दिली जाईल. नौदल हेरगिरीमुळे पाकिस्तानला जास्त फायदा होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणार आहे.

हेरगिरी प्रकरणात आणखी काही जणांविरोधात लवकरच कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने नौदलाला हेरगिरी होऊ नये यासाठी आणखी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. एनआयएच्या तपासातून लवकरच आणखी धक्कादायक गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. 

काही दिवसांपूर्वी भारत सरकारने टप्प्याटप्प्याने कारवाई करुन चीनच्या  २००पेक्षा जास्त मोबाइल अॅपवर बंदी घातली तसेच चिनी कंपन्यांना भारतात पायाभूत विकासाच्या योजनांमध्ये काम करण्यापासून रोखण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. या कारवायांमुळे चिनी हेरगिरीच्या कारवायांना आळा घालण्यास मदत झाली. या पाठोपाठ एनआयएने पाकिस्तान भारतात करत असलेल्या हेरगिरीला थोपवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धरपकड सुरू केली आहे. संरक्षण यंत्रणेतील सदस्यांना शत्रुच्या हेरांपासून संरक्षण व्यवस्थांचे तसेच स्वतःचे रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी