सतत पबजी गेम खेळल्यानंतर १४ वर्षीय मुलाची आत्महत्या  

कोटामध्ये १४ वर्षाच्या मुलाने सतत पबजी खेळल्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

14 year old boy commits suicide after playing pubg downloaded game three days ago
सतत पबजी गेम खेळल्यानंतर १४ वर्षीय मुलाची आत्महत्या    |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • रात्रभर पबजी गेम खेळल्यानंतर १४ वर्षीय मुलाने केली शनिवारी पहाटे आत्महत्या
  • तीन दिवसांपूर्वी डाउनलोड केलेला गेम पबजी गेम 
  • राजस्थानमधील कोटा शहरात घडली धक्कादायक घटना 

कोटा: राजस्थानच्या कोटामध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन  मुलाने रात्री उशिरापर्यंत पबजी खेळल्यानंतर शनिवारी पहाटे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गळफास घेऊन मुलाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. रेल्वे कॉलनी पोलिस स्टेशनचे प्रभारी हंसराज मीणा यांनी सांगितले की, 'हा अल्पवयीन मुलगा नववीत शिकत होता आणि त्याचे वडील सैन्यात नोकरी करतात. शनिवारी सकाळी मुलाने बेडरूममध्ये पंख्याला गळफास घेऊन लटकलेला अवस्थेत आढळून आला.

३ दिवसांपूर्वी डाउनलोड केलेला पबजी गेम 

मीणा यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, 'अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांच्या मते, त्याने तीन दिवसांपूर्वीच आपल्या आईच्या फोनवर पबजी गेम डाउनलोड केला होता आणि सतत तो हाच गेम खेळत होता. आत्महत्येपूर्वी म्हणजे शुक्रवारी रात्री तीन वाजेपर्यंत हा मुलगा दुसऱ्या खोलीत पबजी खेळत होता. यानंतर तो स्वत:च्या खोलीत झोपायला गेला.'

मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला

'दरम्यान, सकाळी तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे त्याला त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने एमबीएस रुग्णालयात दाखल केले. मात्र यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.' असं पोलीस अधिकारी मीणा यांनी सांगितलं. आत्महत्या केलेल्या या अल्पवयीन मुलाचे कुटुंब मूळचे तामिळनाडूचे असून ते गांधी कॉलनी येथे राहतात.

पबजीमुळे १६ वर्षीय मुलानेही गमावला होता आपला जीव 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पबजीच्याच या व्यसनामुळे एका १६ वर्षीय मुलाने आपला जीव गमावल्याची घटना मध्य प्रदेशात घडली होती. या गेमच्या व्यसनापायी मुलांचे हकनाक जीव जाऊ लागले आहेत. मुलांना मैदानी खेळ खेळण्यापेक्षा मोबाईलवर गेम खेळणेच अधिक आवडीचे वाटू लागले आहेत. तसेच सध्या सुट्टी असल्याने मुले सतत तासनंतास मोबाईलमध्ये गेमसाठी डोके खुपसून बसलेली दिसतात. 

मोबाईल फोनवर सलग ६ तास पजबी खेळणे आणि त्यात पराभव झाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. मृत मुलाचे वडील हारून कुरेशी यांनी याबाबत माहिती दिली की, त्यांचा मुलगा फुरकान रात्री दोन वाजेपर्यंत पबजी गेम खेळत होता. त्यानंतर सकाळी उठून तो सहा तास हा गेम खेळत होता. त्यानंतर ब्लास्ट कर, ब्लास्ट कर असे तो ओरडू लागला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी