भारतात १ लाख ४३ हजार १२७ कोरोना रुग्ण

भारतात १ लाख ४३ हजार १२७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशातील १ कोटी ९ लाख ७७ हजार ३८७ जणांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली. यापैकी १ कोटी ६ लाख ७८ हजार ४८ जण कोरोनामुक्त झाले.

143127 corona active cases in India
भारतात १ लाख ४३ हजार १२७ कोरोना रुग्ण 

थोडं पण कामाचं

  • भारतात १ लाख ४३ हजार १२७ कोरोना रुग्ण
  • मागील २४ तासांमध्ये १३ हजार ९९३ नवे कोरोना रुग्ण
  • भारतात १ कोटी ७ लाख १५ हजार २०४ जणांना दिली कोरोनाची लस

नवी दिल्ली: भारतात १ लाख ४३ हजार १२७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशातील १ कोटी ९ लाख ७७ हजार ३८७ जणांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली. यापैकी १ कोटी ६ लाख ७८ हजार ४८ जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे देशात १ लाख ५६ हजार २१२ जणांचा मृत्यू झाला. (143127 corona active cases in India)

तुळजापूर मंदिर प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

मागील २४ तासांमध्ये १३ हजार ९९३ नवे कोरोना रुग्ण आढळले. तसेच १० हजार ३०७ जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे मागील २४ तासांत १०१ मृत्यू झाले. देशात आतापर्यंत २१ कोटी २ लाख ६१ हजार ४८० नमुन्यांची कोरोना तपासणी झाली. यापैकी ७ लाख ८६ हजार ६१८ नमुन्यांची कोरोना तपासणी मागील २४ तासांत झाली. 

आतापर्यंत भारतात १ कोटी ७ लाख १५ हजार २०४ जणांना कोरोनाची लस देण्यात आली. यापैकी ७.५६ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना लसचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात ८.२१ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना लसचा पहिला डोस आणि २६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना लसचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. 

देशात सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये आहेत. केरळमध्ये ६० हजारांपेक्षा जास्त आणि महाराष्ट्रात ४४ हजारांपेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबई मनपाच्या हद्दीत पाच हजारांपेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

कोरोना रुग्णांची संख्य मध्यंतरीच्या काळात कमी होत होती. पण फेब्रुवारीच्या २० दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत हळू हळू नव्याने वाढ होऊ लागली आहे. देशातल्या काही रुग्णांच्या शरीरात परदेशात आढळलेल्या कोरोनाच्या विषाणूचे नवे अवतार सक्रीय झाल्याचे आढळले आहे. यामुळे लस घेतली असेल किंवा नसेल काळजी घ्या, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

मास्क घाला, सोशल डिस्टंस पाळा, वैयक्तिक स्वच्छता राखा, वेळोवेळी हात स्वच्छ धुवा आणि आरोग्याची काळजी घ्या; असे आवाहन आरोग्य यंत्रणेने नागरिकांना केले आहे. तब्येत बिघडल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा, आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये, अशी सूचना आरोग्य यंत्रणेने नागरिकांना केली आहे. 

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लस आहेत. भविष्यात कोरोना होऊ नये म्हणून या लस घ्याव्या लागतात. लसचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. दोन्ही डोस घेतल्यानंतर एक ते दोन आठवड्यात शरीरात कोरोनाला प्रतिंबध करण्यासाठी पुरेशी रोगप्रतिकारक क्षमता विकसित होऊ शकते. नागरिकांनी या वास्तवाचे भान ठेवावे आणि हलगर्जीपणा करू नये, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे. 

देशाच्या अनेक भागांमध्ये अनलॉक नंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू झाली आहे. गर्दीच्या वेळेत अनेकदा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मास्क आणि सोशल डिस्टंस संदर्भातल्या नियमांचे पालन होत नाही. यामुळे कोरोना रुग्ण नव्याने वाढत असल्याचे आढळत आहे. या समस्येवर उपाय म्हणून काही भागांमध्ये मर्यादीत काळासाठी लॉकडाऊन हा प्रयोग राबवून बघितला जात आहे. महाराष्ट्रात अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन सुरू आहे. यात संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ८ पर्यंत लॉकडाऊन आहे. औषधे आणि वैद्यकीय उपकरणांची विक्री करणारी दुकाने, दवाखाने, हॉस्पिटल अशी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आस्थापने वगळून बाकी सर्व आस्थापने लॉकडाऊन काळात बंद राहणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी