GST Collection : जून महिन्यात १ लाख ४४ हजार कोटी रुपये जीएसटी संकलन, वार्षिक ५६ टक्क्यांनी वाढ

जून 2022 मध्ये, एकूण जीएसटी अर्थात वस्तु आणि सेवा कर  महसूल 1,44,616 कोटी रूपये संकलित झाला असून यापैकी केंद्रीय वस्तु आणि सेवा कर म्हणजे सीजीएसटीचा वाटा 25,306 कोटी रूपये, राज्यांचा जीएसटी म्हणजे एसजीएसटी 32,406 कोटी रूपये तर एकीकृत  म्हणजे आयजीएसटीचा वाटा 75,887 कोटी (वस्तुंच्या आयातीवरील 40,102 कोटी रूपयांसह) आणि अधिभार 11,018 कोटी रूपये (वस्तुंच्या आयातीवरील 1197 कोटी रूपयांसह) आहे.

gst collection
जीएसटी संकलन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जून 2022 मध्ये, एकूण जीएसटी अर्थात वस्तु आणि सेवा कर  महसूल 1,44,616 कोटी रूपये संकलित झाला
  • सीजीएसटीचा वाटा 25,306 कोटी रूपये, राज्यांचा जीएसटी
  • एसजीएसटी 32,406 कोटी रूपये तर एकीकृत  म्हणजे आयजीएसटीचा वाटा 75,887 कोटी

GST Collection : नवी दिल्ली : जून 2022 मध्ये, एकूण जीएसटी अर्थात वस्तु आणि सेवा कर  महसूल 1,44,616 कोटी रूपये संकलित झाला असून यापैकी केंद्रीय वस्तु आणि सेवा कर म्हणजे सीजीएसटीचा वाटा 25,306 कोटी रूपये, राज्यांचा जीएसटी म्हणजे एसजीएसटी 32,406 कोटी रूपये तर एकीकृत  म्हणजे आयजीएसटीचा वाटा 75,887 कोटी (वस्तुंच्या आयातीवरील 40,102 कोटी रूपयांसह) आणि अधिभार 11,018 कोटी रूपये (वस्तुंच्या आयातीवरील 1197 कोटी रूपयांसह) आहे. जून 2022 मध्ये, जीएसटीचे एकूण संकलन हे एप्रिल 2022 मध्ये झालेल्या संकलनानंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक संकलन असून एप्रिलमध्ये 1,67,540 कोटी रूपये संकलन झाले होते.

सरकारने आय़जीएसटीच्या रकमेपैकी केंद्रीय जीएसटीसाठी 29,588 कोटी रूपये तर राज्यांच्या जीएसटीसाठी 24,235 कोटी रूपये असे प्रमाण ठरवले आहे. याशिवाय, या महिन्यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये सरकारने तात्पुरत्या आधारावर, आयजीएसटी रकमेपैकी 27,000 कोटी रूपये संकलन हे प्रत्येकी 50:50 गुणोत्तराप्रमाणे  निश्चित केले आहे. जून 2022 मध्ये, नियमित आणि तात्पुरत्या आधारावर जुळवाजुळव झाल्यावर, केंद्र सरकार आणि राज्यांसाठी एकूण जीएसटी संकलन केंद्रीय जीएसटी म्हणजे सीजीएसटीसाठी 68,394 कोटी रूपये तर राज्यांचा जीएसीसाठी 70,141 कोटी रूपये इतके आहे.

जून 2022 चा  जीएसटी  महसूल हा  मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 56 टक्क्यांनी अधिक आहे, जे 92,800 कोटी रूपये होते. मागील वर्षी याच महिन्यातील उत्पन्नापेक्षा, वस्तुंच्या आयातीपासूनचे उत्पन्न 55 टक्क्यांनी अधिक आणि देशांतर्गत व्यवहारांपासून (सेवांच्या आयातीसह) या स्त्रोतांपासून उत्पन्नापेक्षा 56 टक्के अधिक आहे. जीएसटी सुरू झाल्यापासून मासिक संकलनाने पाचव्यांदा आणि मार्च 2022 पासून सलग  चौथ्या महिन्यात  1.40 लाख कोटी रूपयांपेक्षा अधिकचा आकडा पार केला आहे .  जून 2022 मध्ये जीएसटी करसंकलन हे केवळ दुसऱ्या  क्रमांकाचे सर्वाधिक आहे, असे नाही  तर पूर्वी अनुभव आल्यानुसार, जूनमध्ये कमी जीएसटी करसंकलन नोंदवले जाते, हा अनुभवही त्याने खोटा ठरवला आहे.  

मे 2022 मध्ये  7.3 कोटी एकूण ई वे बिल्स निर्माण करण्यात आले जे एप्रिल 2022 मधील 7.4 कोटी पेक्षा 2 टक्क्यांनी कमी आहे. वित्तीय वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत सरासरी मासिक जीएसटी संकलन 1.51 लाख कोटी रूपये राहिले असून गेल्या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 1.10 लाख कोटी रूपये झाले  होते. यात 37 टक्के वाढ झाल्याचे ही आकडेवारी दर्शवते. जीएसटी लागू झाल्यापासून या महिन्यात संकलित एकूण अधिभार हा आतापर्यंत सर्वोच्च आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी