गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे 'एवढे' रुग्ण सापडले! 

corona positive patients: देशात मागील २४ तासात १५५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात १४,८४९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण १,०६,५४,५३३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 

corona patients
कोरोना रुग्ण संख्या  |  फोटो सौजन्य: AP, File Image

थोडं पण कामाचं

  • देशातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट
  • देशात आतापर्यंत कोरोना १ कोटी ६ लाखांहून अधिक लोकांना लागण  
  • गेल्या २४ तासात देशात १५५ रुग्णांचा मृत्यू

मुंबई: Coronavirus india total cases 24 january 2021: देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे १५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १४ हजारांच्या जवळपास कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसात अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत देखील मोठी घट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही समाधानाची बाब मानली जात आहे. गेल्या २४ तासात देशभरात १५,९४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

दरम्यान, आतापर्यंत १ कोटी ६ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासात देशात १४,८४९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. (Corona Positive) तर देशात १५५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Corona Patient Death) सध्या देशभरात १ लाख ८४ हजार अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patients)आहेत. 

आतापर्यंत देशात एकूण १ लाख ५३ हजाराहून अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा १ कोटी ६ लाखांच्या पुढे गेलेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात एकूण १,०६,५४,५३३ रुग्ण सापडले आहेत. (India total corona patients) त्यापैकी १,५३,३३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण:

S. No. Name of State/UT Active Cases* Discharged* Deaths*
1 Andaman and Nicobar Islands 24 4907 62
2 Andhra Pradesh 1473 878232 7147
3 Arunachal Pradesh 37 16725 56
4 Assam 2407 213492 1077
5 Bihar 2599 254563 1476
6 Chandigarh 127 20226 333
7 Chhattisgarh 5040 287677 3609
8 Dadra and Nagar Haveli and Daman and Diu 10 3382 2
9 Delhi 1880 621060 10799
10 Goa 873 51233 761
11 Gujarat 4960 249352 4375
12 Haryana 1559 262507 3009
13 Himachal Pradesh 469 55749 971
14 Jammu and Kashmir 1103 120914 1929
15 Jharkhand 878 116293 1061
16 Karnataka 7361 915924 12193
17 Kerala 72278 808377 3587
18 Ladakh 62 9484 129
19 Lakshadweep 57 0 0
20 Madhya Pradesh 4310 245309 3786
21 Maharashtra 45093 1910521 50740
22 Manipur 196 28405 369
23 Meghalaya 122 13459 146
24 Mizoram 58 4284 9
25 Nagaland 104 11884 88
26 Odisha 1284 330962 1904
27 Puducherry 302 37884 644
28 Punjab 2293 163887 5553
29 Rajasthan 3448 310279 2758
30 Sikkim 134 5802 132
31 Tamil Nadu 4984 816878 12309
32 Telengana 3389 288275 1589
33 Tripura 35 32919 391
34 Uttarakhand 1733 92224 1629
35 Uttar Pradesh 7330 582506 8609
36 West Bengal 6396 551211 10107
Total# 184408 10316786 153339

देशात आतापर्यंत १,०३,१६,७८६ रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या १,८४,४०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रात नेमकी स्थिती काय?

राज्यात मागील २४ तासात २,६९७ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता २०,०६,३५४ एवढी झाली आहे. तर काल एका दिवसात ३,६९४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १९,१०,५२१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

राज्यात एकूण ४३,८७० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, काल एका दिवसात ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ५०,७४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी