२४ तासात प्रचंड रुग्ण वाढले, महाराष्ट्रातील नेमका आकडा किती?

देशात मागील २४ तासात तब्बल ३१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १४९३३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण ४,४०,२१५ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

corona test
कोरोना रुग्ण   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ
  • देशात आता कोरोना रुग्णांची संख्या ४ लाख ४० हजारांच्यावर  
  • गेल्या २४ तासात देशात ३१२ जणांचा मृत्यू

मुंबई: मागील २४ तासात देशात एकूण ३१२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू (Positive Patient Death) झाला आहे. याशिवाय देशात २४ तासात तब्बल १४९३३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांचा आणि मृतांचा आकडा हा सतत वाढत असल्याने आता प्रशासनाची चिंता देखील वाढली आहे.  

भारतात आतापर्यंत १४ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा ४ लाख ४० हजारांच्या देखील पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात एकूण ४,४०,२१५ रुग्ण समोर आले आहेत. (India total corona patients) त्यापैकी १४०११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

सध्या रुग्णांचा आकडा हा वाढतानाच दिसतो आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत २,४८,१९० जण बरेही झाले आहेत. सध्या १,७८,०१४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण: 

क्रमांक राज्य उपचार घेत असलेले रुग्ण* बरे झालेले रुग्ण*   मृत्यू* एकूण रुग्ण*
1 अंदमान आणि निकोबार 11 37 0 48
2 आंध्रप्रदेश 4766 4495 111 9372
3 अरुणाचल प्रदेश 118 21 0 139
4 आसाम 2056 3521 9 5586
5 बिहार 1989 5781 55 7825
6 चंदीगड 83 322 6 411
7 छत्तीसगड 778 1513 12 2303
8 दादरा-नगर हवेली आणि दिव-दमण 64 27 0 91
9 दिल्ली 23820 36602 2233 62655
10 गोवा 711 152 1 864
11 गुजरात 6232 19909 1684 27825
12 हरियाणा 4940 5916 169 11025
13 हिमाचल प्रदेश 282 437 8 727
14 जम्मू-काश्मीर 2472 3531 85 6088
15 झारखंड 657 1469 11 2137
16 कर्नाटक 3527 5730 142 9399
17 केरळ 1540 1749 21 3310
18 लडाख 710 136 1 847
19 मध्यप्रदेश 2342 9215 521 12078
20 महाराष्ट्र 61807 67706 6283 135796
21 मणिपूर 648 250 0 898
22 मेघालय 6 37 1 44
23 मिझोराम 132 9 0 141
24 नागालँड 139 141 0 280
25 ओडिशा 1425 3863 15 5303
26 पद्दुचेरी 226 149 8 383
27 पंजाब 1309 2825 101 4235
28 राजस्थान 2966 11910 356 15232
29 सिक्किम 49 29 0 78
30 तमिळनाडू 27181 34112 794 62087
31 तेलंगणा 4452 4005 217 8674
32 त्रिपुरा 454 782 1 1237
33 उत्तराखंड 853 1521 28 2402
34 उत्तर प्रदेश 6152 11601 569 18322
35 पश्चिम बंगाल 5102 8687 569 14358
  इतर 8015     8015
  एकूण# 178014 248190 14011 440215
 

महाराष्ट्रात नेमकी स्थिती काय? 

राज्यात गेल्या २४ तासात ३७२१ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १,३५,७९६ एवढी झाली आहे. तर १९६२ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ६७,७०६ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ६१७९३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात मागील २४ तासात ११३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात ६२८३ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. 

दरम्यान, देशात अनलॉक १.० सुरु आहे. अनलॉक १.० मध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे. दरम्यान, याआधीच झोननुसार काही सवलती देण्यात आलेल्या होत्या. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने तीन भागात देशाचे विभाजन केले होते. पहिला हॉटस्पॉट जिल्हे (रेड झोन) , दुसरे करोनाचे रुग्ण आढळले पण हॉटस्पॉट नसलेले जिल्हे (ऑरेंज झोन) आणि तिसरा ग्रीन झोन जिथे करोना रुग्ण नाहीत, असे वर्गीकरण करण्यात आले आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी