दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १४ ऑक्टोबर २०१९: सिलेंडरचा भीषण स्फोट ते 'हिरकणी'चा ट्रेलर रिलीज 

Headlines of the 14th October 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर... 

Daily news
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १४ ऑक्टोबर २०१९   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १३ ऑक्टोबर २०१९:  आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी उत्तरप्रदेशमधली. आज मउ जिल्हा सिलेंडरच्या स्फोटानं हादरला. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून संपूर्ण इमारतही कोसळली आहे. दुसरी महत्त्वाची बातमी आहे, मुंबईत झालेल्या बलात्काराची.  मुंबईतील एका डॉक्टरने उपचाराच्या नावाखाली एका महिलेवर बलात्कार करुन तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी डॉक्टरला १७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिसरी बातमी आहे, राज ठाकरे यांच्या संदर्भातली. लोकसभा निवडणुकीवेळी  सत्ताधारी भाजप-सेनेच्या उमेदवारांची आणि नेत्यांची झोप उडविणाऱ्या 'लाव रे तो व्हिडिओ'चा पार्ट टू होऊ शकतो, असे संकेत राज ठाकरे यांनी दिले आहे. चौथी बातमी आहे, अंजली दमानिया यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विनोदी ट्विट केलं आहे. आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. पाचवी बातमी, हिरकणी या मराठी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. खुद्द माधुरी दीक्षितने सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज केला आहे. या सर्व बातम्या सविस्तर वाचूया. 

  1. सिलेंडरचा भीषण स्फोट, १२ जणांचा मृत्यू; स्फोटात संपूर्ण इमारतच कोसळली : उत्तरप्रदेशमधील मउ जिल्ह्यात झालेल्या सिलेंडर स्फोटात तब्बल १२ जणांचा मृत्यू झाला असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सिलेंडर स्फोटामुळे इमारतीचे दोन मजले कोसळले. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  2. पाईल्सच्या उपचाराच्या नावाखाली महिलेवर बलात्कार, शारीरिक संबंधासाठी ब्लॅकमेल करणारा डॉक्टर गजाआड :  मुंबईतील एका डॉक्टरने उपचाराच्या नावाखाली एका महिलेवर बलात्कार करुन तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बातमी वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. लाव रे व्हिडिओ' पार्ट २ वर असं बोलले राज ठाकरे : लोकसभा निवडणुकीवेळी  सत्ताधारी भाजप-सेनेच्या उमेदवारांची आणि नेत्यांची झोप उडविणाऱ्या 'लाव रे तो व्हिडिओ'चा पार्ट टू होऊ शकतो, असे संकेत राज ठाकरे यांनी दिले आहे. बातमी संपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  4. आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीवर अंजली दमानियांचं विनोदी ट्विट :  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विनोदी ट्विट करत खिल्ली उडवली आहे. आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  5. Hirkani Trailer: ‘हिरकणी’ अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज : प्रत्येक आई असतेच हिरकणी असं म्हणत हिरकणीचं पोस्टर भेटीला आलं. त्यानंतर सिनेमाचं टीझर आणि गाणं देखील रिलीज झालं. आता खुद्द माधुरी दीक्षितने सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज केला आहे. हिरकणी सिनेमाचा ट्रेलर पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी