दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ एप्रिल २०१९: राज ठाकरेंची पुन्हा फटकेबाजी ते वर्ल्डकप टीम जाहीर

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 15, 2019 | 23:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. या पैकी महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा फक्त एका क्लिकवर...

15 april 2019 big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ एप्रिल २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई:  आज दिवसभरात विविध घटना घडल्या आहेत. या घटनांपैकी दिवसभरातील महत्त्वाच्या अशा काही घटना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जबरदस्त बातम्या या सदरातून. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोलापूरात सभा पार पडली. या सभेत पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. नाव न घेता राज ठाकरेंनी शिवसेना मतदान न करण्याचं आवाहन देखील केलं. त्यानंतर मुंबईत  उर्मिला मातोंडकरांच्या रॅलीमध्ये काँग्रेस भाजप कार्यकर्ते भिडल्याचं प्रकरण समोर आलं.  उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार रॅलीमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर कार्यकर्ते एकमेकांना भि़डले. तर तिकडे हवामान खात्यानं भविष्यवाणी केली आहे. यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. त्यानंतर बातमी आहे खेळ विश्वातील. आज वर्ल्डकप २०१९ साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. यात काही खेळाडूंची वर्णी लागली तर काहींना डच्चू देण्यात आला आहे. तप पाचवी बातमी आहे मनोरंजन विश्वातील. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रूबीना दिलाइक हिला लवकरच हाताची सर्जरी करावी लागणार आहे. त्यामुळे तिच्या शूटिंगमध्ये व्यत्यय देखील येणार आहे. या पाचही बातम्या सविस्तर वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा. 

  1. भाजपकडे आता पुन्हा ढुंकूनदेखील बघू नका राज ठाकरे यांचं वक्तव्य :  Lok Sabha 2019 : लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार रिंगणात न उतरवता भाजप शिवसेना युतीच्या विरोधात सभा घेणाऱ्या राज ठाकरे यांची आज, सोलापुरात सभा झाली. त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांना लक्ष्य केले. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  2. उर्मिला मातोंडकरांच्या रॅलीमध्ये काँग्रेस भाजप कार्यकर्ते भिडले: सोमवारी सकाळी बोरिवली स्टेशनवर  उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार रॅलीमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर कार्यकर्ते एकमेकांना भि़डले.  बातमी आणि व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  3. हवामान खात्याची भविष्यवाणी, या वर्षी होणार चांगला पाऊस :  हवामान खात्याने २०१९ मध्ये सामान्य पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच शेती उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  4. विश्वचषक २०१९ साठी भारतीय संघ जाहीर :  World Cup 2019 India team players विश्वचषक २०१९ साठी टीम इंडियाची आज घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने मुंबईतील बैठकीनंतर बीसीसीआयच्या मुख्यालयात ही घोषणा केली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा. 
  5. रूबीना दिलाइकला 'या' कारणामुळे करावी लागणार सर्जरी :  टीव्ही शो शक्ति एक अस्तित्त्व के अहसास की मधली लीड एक्ट्रेस रूबीना दिलाइक गेल्या काही दिवसांपासून खूप त्रासली आहे. रूबीनाला आता सर्जरी करावी लागणार आहे. जाणून घेऊया नेमकं काय झालं रूबीनाला. बातमी आणि व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ एप्रिल २०१९: राज ठाकरेंची पुन्हा फटकेबाजी ते वर्ल्डकप टीम जाहीर Description: Headlines of the day: आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. या पैकी महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा फक्त एका क्लिकवर...
Loading...
Loading...
Loading...