१५ ऑगस्ट २०१९ LIVE Streaming: 'येथे' पाहा पंतप्रधान मोदींचं भाषण LIVE

१५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिवस. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला राष्ट्रध्वज फडकावतील त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्देशून भाषण करतील. पंतप्रधान मोदींचं हे भाषण तुम्ही Live पाहू शकणार आहात.

PM Narendra Modi speech on Independence Day
'येथे' पाहा पंतप्रधान मोदींच्या भाषण   |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

 • पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण LIVE
 • स्वातंत्र्य दिनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचं लाईव्ह स्ट्रीमिंग
 • विविध ठिकाणी पाहता येणार मोदींचं भाषण लाईव्ह
 • सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सुद्धा मोदींचं भाषण पाहता येणार LIVE

मुंबई: १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. यंदाचा स्वातंत्र्य दिन हा भारताचा ७३वा स्वातंत्र्य दिन असणार आहे. १९४७ मध्ये तब्बल २०० वर्षांनंतर भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळाली. तेव्हापासून भारतात प्रत्येकवर्षी १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्य दिनाच्या या क्षणी पंतप्रधानांचं दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भाषण होतं. गुरुवारी, १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना उद्देशून भाषण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे भाषण तुम्ही थेट लाईव्ह पाहू शकणार आहात.

स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी दिल्लीतील लाल किल्यावर आपल्या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकवतील. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशवासियांना उद्देशून भाषण करतील. संपूर्ण देशातील नागरिकांचं लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भाषणाकडे असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलतात? याची उत्सुकता सर्वांनाच आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं १५ ऑगस्ट २०१९ चं लाल किल्ल्यावरुन होणारं हे भाषण तुम्ही लाईव्ह पाहू शकता. भाषणाचं लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही फेसबुक, यूट्यूब, नमो अॅप आणि ट्विटरवर सुद्धा पाहू शकणार आहात.

खाली दिलेल्या लिंक्सवरुन तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं १५ ऑगस्टचं भाषण लाईव्ह ऐकू आणि पाहू सुद्धा शकता.

फेसबुक 

 1. https://www.facebook.com/narendramodi
 2. https://www.facebook.com/DoordarshanNational/
 3. https://www.facebook.com/BJP4India/
 4. https://www.facebook.com/PMOIndia/ 

ट्विटर

 1. https://twitter.com/narendramodi
 2. https://twitter.com/narendramodi_in
 3. https://twitter.com/PMOIndia
 4. https://twitter.com/DDNational
 5. https://twitter.com/DDNewsHindi

यूट्यूब

 1. https://www.youtube.com/user/narendramodi
 2. https://www.youtube.com/user/DoordarshanNational
 3. https://www.youtube.com/pmoindia
 4. https://www.youtube.com/user/BJP4India

इतर प्लॅटफॉर्म 

 1. https://www.narendramodi.in/

या व्यतिरिक्त तुम्ही नमो अॅपवर सुद्धा मोदींचं भाषण पाहू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनमध्ये नमो अॅप डाऊनलोड करावं लागेल. नमो अॅपमधील स्क्रीनवर तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं १५ ऑगस्टचं भाषण लाईव्ह ऐकता आणि पाहता सुद्धा येणार आहे. यासोबतच इंडिया गेट येथे आयोजित कार्यक्रमाचा आनंद सुद्धा तुम्हाला घेता येणार आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांकडून १५ ऑगस्ट रोजीच्या भाषणापूर्वी सूचना मागवल्या होत्या. नागरिकांनी आपल्या सूचना द्याव्यात असं आवाहन पंतप्रधान यांनी केलं होतं. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना उद्देशून भाषण करणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत बहूमत मिळवलं. त्यानंतर पुन्हा एकदा देशात भाजपची सत्ता आली आणि नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची ही दुसरी टर्म आहे आणि या दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच १५ ऑगस्ट आहे. मोदी आपल्या या भाषणात काय बोलतात हे पहावं लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
१५ ऑगस्ट २०१९ LIVE Streaming: 'येथे' पाहा पंतप्रधान मोदींचं भाषण LIVE Description: १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिवस. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला राष्ट्रध्वज फडकावतील त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्देशून भाषण करतील. पंतप्रधान मोदींचं हे भाषण तुम्ही Live पाहू शकणार आहात.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...