Video: भयंकर... १५ वर्षीय मुलीने बहिणीची तलवारीने मानच उडवली!

Rajasthan girl beheaded: एका 15 वर्षीय मुलीने तिच्या नऊ वर्षांच्या चुलत बहिणीचा तलवारीने शिरच्छेद केल्याची अत्यंत धक्कादायक घटना राजस्थानच्या डुंगरपूर जिल्ह्यात घडली.

15 year old girl severed her cousins neck with a sword rajasthan incident video
१५ वर्षीय मुलीने बहिणीची तलवारीने मानच उडवली!  
थोडं पण कामाचं
  • १५ वर्षाच्या मुलीने ९ वर्षाच्या बहिणीची तलावारीने मुंडकंच तोडलं
  • देवी माता अंगात आल्याचं सांगत अल्पवयीन मुलीने केलं भयंकर कृत्य
  • राजस्थानच्या डुंगूरपूरमध्ये घडली घटना

Murder: डुंगरपूर (राजस्थान):  राजस्थानच्या (Rajasthan) डुंगरपूर जिल्ह्यातील अंधश्रद्धेमुळे एका नऊ वर्षाच्या मुलीचा हकनाक बळी गेल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली. आहे. त्याचं झालं असं की, रविवारी रात्री दशा माता व्रत उत्सवादरम्यान एका १५ वर्षीय मुलीने मातेचा आत्मा आपल्यात येत असल्याचे सांगत तलवार (sword) घेऊन भयंकर गोंधळ घातला. यावेळी १५ वर्षीय तरुणीने झोपेत असलेल्या आपल्या नऊ वर्षांच्या चुलत बहिणीवर तलवारीने एवढ्या भयंकरपणे वार केला की, तिची मान धडापासून अक्षरश: वेगळी झाली. या घटनेनंतर गावात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. (15 year old girl severed her cousins neck with a sword rajasthan incident video)

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाली अमावस्येच्या दिवशी चितारी  येथील शंकरपुत्र रामजी डेंडोर यांच्या घरी दशामातेच्या मूर्तीची स्थापना करून सकाळ-संध्याकाळ पूजा सुरू होती. येथील लोकांचा असा समज आहे की, दशमातेचे रूप रात्री येते. त्यामुळे आजूबाजूचे सर्व लोक दर्शनासाठी तिथे येतात. रविवारी रात्रीही नेहमीप्रमाणे दशामातेच्या पूजेचा कार्यक्रम रात्री आठ वाजल्यापासून सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

अधिक वाचा: Crime : एकत्र संपवल्या होत्या 3 पिढ्या, 7 खून करणाऱ्या रक्तपिपासू ड्रायव्हरला झाली फाशीची शिक्षा 

ती तलवारी घेऊन अंगणात धावू लागली...

यादरम्यान, शंकरच्या 15 वर्षांच्या मुलीने हातात नंग्या तलवार घेऊन लोकांना सांगितले की ती सर्वांना ठार मारेल. असं म्हणत ती तलवार घेऊन घराच्या अंगणात भयंकर वेगाने धावू लागली. यावेळ शंकर व त्याचा मोठा भाऊ सुरेश यांनी मुलीला पकडण्याचा अटोकाट प्रयत्न केला. पण तिने त्या दोघांवर देखील तलवारीने हल्ला केला. ज्यामध्ये दोघांना किरकोळ दुखापत झाली.
 

... मुलीच्या मृतदेहावर करत राहिली सतत वार

मुलीचा हा भयंकर अवतार पाहून कुटुंबीयांमधील इतर लोक हे इकडे-तिकडे पळू लागले. मात्र, त्याच घरात सुरेश यांची मुलगी वर्षा (9) ही घरात झोपली होती. त्यावेळी १५ वर्षीय मुलगी ही तिच्याकडे गेली आणि तिला ओढत घराच्या दुसऱ्या भागात घेऊन गेली. त्यानंतर तिने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या हातातील  तलवारीने तुफान वेगाने वार केला. तिने केलेला हा वार एवढा भयंकर होता की, ज्यामध्ये मुलीची मान हे धडापासून वेगळं झालं.  यानंतरही तिचा आवेश काही थांबला नाही, ती किती तरी वेळ मुलीच्या मृतदेहावर वार करतच राहिली.

अधिक वाचा: Cold blooded murder : आजारी लेकीला मारहाण करणाऱ्या जावयाचा सासऱ्याने काढला काटा, असा केला खून

कुटुंबीयांनी मुलीला घेराव घालून पकडले...

दरम्यान, घरापासून दूर पळून गेलेल्या कुटुंबीयांना आपल्यासोबत 'वर्षा' नसल्याचे समजताच त्यांनी पुन्हा घराच्या दिशेने धाव घेतली. पण तोवर फारच उशीर झाला होता. कारण तेवढ्या वेळात वर्षाचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला होता. यानंतर सर्व कुटुंबीयांनी मिळून मुलीला घेराव घातला आणि तिला पकडले.  

अधिक वाचा: OMG! पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला 10 वर्षांचा तुरुंगवास, मग आली पत्नी जिवंत असल्याची बातमी आणि…

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच चितारीचे पोलीस अधिकारी गोविंद सिंग मय जप्ता घटनास्थळी पोहोचले. सोमवारी सकाळी बांसवाडा येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे पथकही घटनास्थळी पोहोचले. आता याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीला ताब्यात घेतले असून सध्या तिची चौकशी सुरु आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी