बापरे ! गेल्या २४ तासात १५०० जणांचा मृत्यू , एका दिवसात २ लाख ६१ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद

कोरोनाने देशात भयाण रुप धारण केलं आहे. नव्या म्युटेशनमुळे करोना संक्रमणाचा प्रसार वाऱ्यासारखा होत असून, देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे.

Dad! 1500 deaths in last 24 hours, 2 lakh 61 thousand new corona patients recorded in one day 18
बापरे ! गेल्या २४ तासात १५०० जणांचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक
  • आठ राज्यातील मृत्यूचे प्रमाण ७८.३६ टक्के
  • कोरोनामुळे मृत्यू होण्याचा दर १.२२ टक्के

नवी दिल्ली : कोरोनाने देशात भयाण रुप धारण केलं आहे. नव्या म्युटेशनमुळे करोना संक्रमणाचा प्रसार वाऱ्यासारखा होत असून, देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. एका दिवसात लाखोंच्या संख्येने रुग्ण वाढू लागल्याने  देशात नव्या विश्वविक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. यात चिंता करणारी बाब म्हणजे वाढणाऱ्या रुग्णसंख्येबरोबरच देशातील मृत्यूंची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. 

कोरोनाच्या लाटेत कोरोनाबाधितांचा संख्या झपाट्याने वाढत असून नवे विक्रम बनवत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६१ हजार ५०० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत १ लाख ३८ हजार ४२३ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशासाठी चिंतेची बाब म्हणजे मृतांच्या संख्येत २४ तासांतच मोठी वाढ झाली आहे. देशात १ हजार ५०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या १ लाख ७७ हजार १५० वर पोहोचली आहे.पहिल्या लाटेपेक्षा करोनाची दुसरी लाट घातक ठरताना दिसत आहे. युके, दक्षिण, ब्राझील या देशात आढळून आलेल्या करोनाच्या नव्या स्ट्रेनसह डबल म्युटेशनही भारतात आढळून आले असून, त्यामुळे परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत चालली आहे. देशात करोना संक्रमण वेगानं वाढत असून दररोज विक्रमी रुग्णसंख्या नोंदवली जात आहे. 

रुग्ण बरे होण्याचं प्रमाण घटलं 

कोरोनापासून रुग्ण बरे होण्याचा दर कमी झाला आहे. आता ही टक्केवारी ८६.६ टक्के झाली आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १ कोटी २८ लाख ३ हजार ७९१ झाली आहे. तर मृत्यू दर हा १.२२ टक्के आहे. 

फक्त राज्यात ५८ टक्के नवे कोरोना संक्रमित 

देशात प्रत्येक दिवशी सापडणारे कोरोना रुग्णांमध्ये ५८.४ टक्के रुग्ण फक्त पाच राज्यात आहेत. यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, हे राज्य आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ६७ हजार१२३ प्रकरणे समोर आली आहेत. यानंतर उत्तर प्रदेशात २७ हजार ३३४, तर दिल्लीमध्ये २४ हजार ३७५ , छत्तीसगडमध्ये १६,०८३ आणि कर्नाटकात १७ हजार ४८९ नवे प्रकरणे समोर आली आहेत. 

आठ राज्यात सर्वाधिक मृत्यू  

देशात गेल्या २४ तासात १५०० जणांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात असून गेल्या २४ तासात १५०० जणांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या स्थानी दिल्ली असून येथे १६७ जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यानंतर छत्तीसगडात १५९, उत्तर प्रदेश १२०, गुजरात ९७, कर्नाटक ८०, मध्य प्रदेशात ६६, आणि पंजाबमध्ये ६२ जणांच्या मृत्यू झाला आहे. एकूण मृत पावणाऱ्यांची टक्केवारी पाहिली तर या आठ राज्यातून ७८.३६ टक्के मृत्यू होत आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी