Pakistan Hacking: पाकिस्तान अन् चीनचे वाजले बारा; भारत समर्थक हॅकर्सनी उडवल्या लष्कराच्या 15000 फाईल्स

सध्या चीन (China)पासून पाकिस्तान (Pakistan)पर्यंत खळबळ उडाली आहे. भारत समर्थक हॅकर्सनी (Pro-India hackers) पाकिस्तान वायुसेना (PAF) आणि चीनच्या सुरक्षा संस्थेतील (security agencies) यंत्रणा हॅक करून दोन्ही देशांना मोठा झटका दिला आहे. हॅकर्सनी अनेक महत्वाची आणि गंभीर लष्करी माहिती उडवली असल्याचं सांगण्यात येत आहे, याबाबतील बातमी नवभारत टाइम्सनं दिली आहे. 

Pro-India hackers launch major cyber attack on China and Pakistan
भारत समर्थक हॅकर्सचा चीन आणि पाकिस्तानवर मोठा सायबर हल्ला  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भारत समर्थक हॅकर्सचा चीन आणि पाकिस्तानवर मोठा हल्ला
  • मे महिन्यात पाकिस्तान आणि चीनच्या संरक्षण यंत्रणेवर सायबर हल्ला.
  • महत्वाची आणि गंभीर लष्करी माहिती हॅकर्सनं पळवली.

इस्‍लामाबाद: सध्या चीन (China)पासून पाकिस्तान (Pakistan)पर्यंत खळबळ उडाली आहे. भारत समर्थक हॅकर्सनी (Pro-India hackers) पाकिस्तान वायुसेना (PAF) आणि चीनच्या सुरक्षा संस्थेतील (security agencies) यंत्रणा हॅक करून दोन्ही देशांना मोठा झटका दिला आहे. हॅकर्सनी अनेक महत्वाची आणि गंभीर लष्करी माहिती उडवली असल्याचं सांगण्यात येत आहे, याबाबतील बातमी नवभारत टाइम्सनं दिली आहे. 

ही घटना यावर्षी मे महिन्यात घडल्याचे सांगितले जात आहे, मात्र या महिन्यात त्याविषयीची माहिती लीक झाल्यामुळे पाकिस्तानातील जवळच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या पाकिस्तान आणि चीन दोन्ही देश सायबर सुरक्षेसाठी एकत्र काम करत आहेत. दोघांचा दावा आहे की भारताच्या हॅकर्स मित्रांनी त्यांच्या सायबर स्पेसवर हेरगिरी केली आहे. 

पाकिस्तानी नौदलावर हल्ला

चीन आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की हॅकर्सनी अशा सुमारे 15,000 फाईल्स हॅक केल्या आहेत ज्यात पाकिस्तानी संरक्षण अधिकार्‍यांकडून काही माहिती देण्यात आली होती. 

Read Also : अक्षर पटेलच्या उत्तुंग षटकारनं मोडला धोनीचा जुना विक्रम

यानंतर पाकिस्तानच्या तज्ज्ञांना कळू शकले की त्यांची माहिती चोरीला गेली आहे.काही पुष्टी न झालेल्या दाव्यांनुसार, हॅकर्सनी त्यांच्या सिस्टमचा भंग झाल्याचे काही संकेत सोडले. मार्च महिन्यात अशीच एक घटना घडली होती ज्यामध्ये पाकिस्तानी नौदलाची माहिती चोरीला गेली होती. 

Read Also : वारे व्वा ! कार्यकाळ संपल्यानंतरही माजी राष्ट्रपतींची मज्जा

चीन आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत ही माहिती उपलब्ध झाली आहे. चीनच्या सरकारी माध्यमांमध्ये या महिन्यात एक अहवाल आला होता. हॅकर्स भारतात असून ते एकामागून एक अनेक हल्ले करत आहेत, असे सांगण्यात आले. गेल्या वर्षी अशाच हल्ल्यांमध्ये चीनच्या लष्करी संस्थांना लक्ष्य करण्यात आले होते.  या अहवालात दावा करण्यात आला होता की, हॅकर्स केवळ डेटाच चोरत नाहीत तर ते उर्जेशी संबंधित संपूर्ण पायाभूत सुविधांचेही नुकसान करत आहेत. 

भारतावरही मोठा सायबर हल्ला

चीन आणि पाकिस्तानच्या अधिकार्‍यांचे दावे खरे ठरले तर माहिती चोरीला गेल्याची या वर्षातील ही पहिलीच घटना असेल. चीन आणि पाकिस्तान भारतीय सैन्यावर असेच अनेक सायबर हल्ले करत आहेत. ऑक्टोबर 2020 मध्ये, भारत अशाच एका सायबर हल्ल्याचा बळी ठरला होता, त्यानंतर मुंबईत मोठ्या प्रमाणात वीज संकट निर्माण झाले होते. मात्र, चीनने ते स्वीकारण्यास नकार दिला.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी