कोरोना रुग्णांमध्ये होऊ लागली आहे घट, पाहा महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा 

corona positive patients: देशात मागील २४ तासात १५१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात १५,२२३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण १,०६,१०,८८३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

corona patients
कोरोना रुग्ण संख्या  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • देशातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट
  • देशात आतापर्यंत कोरोना १ कोटी ६ लाखांहून अधिक लोकांना लागण  
  • गेल्या २४ तासात देशात १५१ रुग्णांचा मृत्यू

मुंबई: Coronavirus india total cases 21 january 2021: देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे १५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १५ हजारांच्या जवळपास कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या अनेक दिवसांच्या तुलनेत मृतांचा आकडा कमी झाला आहे. तसेच अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत देखील मोठी घट झाली आहे. गेल्या २४ तासात देशभरात १९,९६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

दरम्यान, आतापर्यंत १ कोटी ६ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासात देशात १५,२२३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. (Corona Positive) तर देशात १५१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Corona Patient Death) सध्या देशभरात १ लाख ९२ हजार अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patients)आहेत. 

आतापर्यंत देशात एकूण १ लाख ५२ हजाराहून अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा १ कोटी ६ लाखांच्या पुढे गेलेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात एकूण १,०६,१०,८८३ रुग्ण सापडले आहेत. (India total corona patients) त्यापैकी १,५२,८६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण:

S. No. Name of State/UT Active Cases* Discharged* Deaths*
1 Andaman and Nicobar Islands 29 4900 62
2 Andhra Pradesh 1637 877639 7142
3 Arunachal Pradesh 46 16713 56
4 Assam 2663 213179 1077
5 Bihar 3143 253569 1464
6 Chandigarh 171 20122 330
7 Chhattisgarh 5798 285566 3585
8 Dadra and Nagar Haveli and Daman and Diu 11 3380 2
9 Delhi 2147 620128 10774
10 Goa 865 51036 756
11 Gujarat 5748 247223 4371
12 Haryana 1734 261955 2997
13 Himachal Pradesh 575 55540 967
14 Jammu and Kashmir 1099 120625 1923
15 Jharkhand 1102 115853 1057
16 Karnataka 7716 913677 12185
17 Kerala 69914 790757 3524
18 Ladakh 76 9463 129
19 Lakshadweep 30 0 0
20 Madhya Pradesh 5008 243688 3770
21 Maharashtra 47982 1899428 50582
22 Manipur 244 28308 367
23 Meghalaya 133 13440 144
24 Mizoram 69 4268 9
25 Nagaland 106 11873 88
26 Odisha 1500 330321 1902
27 Puducherry 296 37798 643
28 Punjab 2405 163211 5520
29 Rajasthan 4077 308985 2754
30 Sikkim 160 5766 131
31 Tamil Nadu 5314 814811 12290
32 Telengana 3920 287117 1584
33 Tripura 37 32911 391
34 Uttarakhand 2005 91565 1622
35 Uttar Pradesh 7873 581164 8591
36 West Bengal 6675 549727 10080
Total# 192308 10265706 152869

देशात आतापर्यंत १,०२,६५,७०६ रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या १,९२,३०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रात नेमकी स्थिती काय?

राज्यात मागील २४ तासात ३,०१५ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १९,९७,९९२ एवढी झाली आहे. तर काल एका दिवसात ४,५८९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १८,९९,४२८ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

राज्यात एकूण ४७,९८२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, काल एका दिवसात ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ५०,५८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी