16 dead including 4 Indians in building fire in Dubai : दुबईत अल रास भागातील एका जुन्या इमारतीला आग लागली. या दुर्घटनेत 4 भारतीयांसह 16 जणांचा मृत्यू झाला. आगीत होरपळल्यामुळे 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीत प्रामुख्याने नोकरी करणारे नागरिक भाडेपट्टीवर वास्तव्यास होते.
रिजेश कलंगदान (38) आणि रिजेश यांची पत्नी जेशी कंदमंगलथ (32) या दोघांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. हे दोघेही केरळचे रहिवासी आहेत. या दोघांव्यतिरिक्त गुडु सलियाकुंडु (49) आणि इमामकासिम अब्दुल खदेर (43) या भारतीयांचाही दुर्घटनेत मृत्यू झाला. हे दोघे तामीळनाडूचे रहिवासी आहेत. इमारत दुर्घटनेत मृत्यू झालेल्या चौघांच्या पासपोर्टची प्रत त्यांच्या एजंटने भारताच्या दुबईतील वाणिज्य दुतावासाकडे सादर केली आहे. वाणिज्य दुतावासाचे अधिकारी मृतांच्या भारतातील नातलगांशी संपर्क साधून नियमानुसार पुढील कारवाई करतील.
इमारतीला आग लागण्याची घटना शनिवार 15 एप्रिल 2023 रोजी दुपारी घडली. आग लागल्याची माहिती दुबईच्या सिव्हिल डिफेन्स मुख्यालयाला शनिवार 15 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी घडली. या इमारत दुर्घटनेत ज्या 16 जणांचा मृत्यू झाला त्यातील 3 पाकिस्तानच्या पुरुषांची आणि एका नायजेरियाच्या महिलेची ओळख पटविण्यात आली आहे.
शंकराला प्रसन्न करून आयुष्यातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी सोमवारी करा हे उपाय
किती शिकले आहेत दिग्गज भारतीय उद्योगपती