मोठी बातमी ! राजकीय भूकंप होणार; भाजपचे १६ आमदार फुटणार, 'या' नेत्याच्या दाव्याने खळबळ

Political news updates: भारतीय जनता पक्षाचे १६ आमदार आपल्या संपर्कात असून ते फुटणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भाजपचे १६ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा
  • या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • आमदार फुटल्याचा दावा भाजपने फेटाळला

BJP 16 MLA in our touch claim by JMM: महाराष्ट्रात राजकीय भूकंप आल्यानंतर सत्तांतर झालं आहे. शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत मिळून सत्ता स्थापन केली. राज्याच्या राजकारणात घडलेल्या या घडामोडींनंतर आता झारखंडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. झारखंडमधील भाजपचे १६ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम)ने केला आहे. जेएमएमच्या या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण आले असून झारखंडमध्ये राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. (16 MLA of BJP in our touch claim by jharkhand mukti morcha)

झारखंड मुक्ती मोर्चाचे सुप्रियो भट्टाचार्य यांनी दावा केला आहे की, भारतीय जनता पक्षाचे १६ आमदार आमच्या पक्षाच्या संपर्कात आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाकडून करण्यात आलेल्या या दाव्यामुळे झारखंडमधील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे खाण घोटाळ्या प्रकरणी तपास यंत्रणांच्या रडारवर असताना झामुमो नेत्याने हा दावा केला आहे. रिपोर्ट्सनुसार, सुप्रियो भट्टाचार्य यांनी म्हटलं, "भाजपमध्ये आमदारांची घुसमट होत आहे. त्यामुळेच ते हेमंत सोरेन सरकारला पाठिंबा देण्यासाठी तयार आहेत. त्यांना आपला स्वतंत्र गट स्थापन करुन झामुमोच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा द्यायचा आहे."

अधिक वाचा : "... तर तुमचे लवंडे कसे वागले असते" Ashish Shelar यांचा Uddhav Thackeray यांच्यावर हल्लाबोल

औपचारिक प्रस्तावानंतर निर्णय 

झामुमोच्या नेत्याने पुढे म्हटलं, बंडखोर आमदारांकडून एक औपचारिक प्रस्ताव आल्यावर आमचा पक्ष यासंदर्भात पुढील निर्णय घेईल. झारखंडमधील राज्य सरकार स्थिर असल्याच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला आला. राज्यातील काँग्रेसच्या आमदारांना भाजप आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे या प्रश्नावर भट्टाचार्य यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अधिक वाचा : भाजपचं ठरलं; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात होणार ऑपरेशन लोटस

भाजपने दावा फेटाळला

तर तिकडे झारखंडमधील भाजपने झामुमो नेत्यांचा दावा फेटाळून लावला आहे. आमचे आमदार बंडखोरी करणार नाहीत आणि भाजपत कुठलीही फूट पडणार नाही असा दावा भाजपने केला आहे. भाजपचे प्रवक्ते प्रतुल शहदेव यांनी म्हटलं, झामुमोचे आमदार हे भ्रष्टाचारात अडकले आहेत. त्यांचा पक्ष आपली अस्मिता वाचवण्यासाठी लढा देत आहे. त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. झामुमोचे आमदार लूट आणि भ्रष्टाचार करत आहेत. त्यांना खोटं बोलून आपला दर्जा जपायचा आहे.

झामुमोच्या २१ आमदारांची बंडखोरी - भाजप

तर भाजपचे खासदार डॉ निशिकांत दुबे यांनी सोमवारी म्हटलं, जेएमएमचे महासचिव पंकज मिश्रा हे तुरुंगात गेल्यामुळे पक्षाला धक्का बसला आहे. झामुमोच्या २१ आमदारांनी बंड केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातच बंडखोरी आहे. तर भाजप चोरांच्या टोळीशी आणि भ्रष्ट पक्षाच्या विरोधात लढत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी