सिक्कीममध्ये मोठी दुर्घटना !, सैनिकांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळल्याने 16 जण शहीद

sikkim indian army achchidaint: सिक्कीममध्ये झालेल्या भीषण रस्ता अपघातात भारतीय लष्कराचे १६ जवान शहीद झाले. लाचेन भागात लष्कराचे वाहन दरीत कोसळले. या अपघातात चार जवान जखमी झाले आहेत.

16 soldiers martyred as army vehicle overturned in Sikkim, truck fell into deep gorge
सिक्कीममध्ये मोठी दुर्घटना !, सैनिकांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळल्याने १६ जवान शहीद  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सिक्कीममध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात झाला
  • तीव्र उतारामुळे लष्कराचा ट्रक घसरला
  • या दुर्घटनेत भारतीय लष्कराचे १६ जवान शहीद, चार जवान जखमी

गंगटोक : ईशान्येकडील सिक्कीम राज्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. येथे भारतीय लष्कराचे वाहन पलटी झाल्याने 16 जवान शहीद झाले. या अपघातात चार जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर सिक्कीममध्ये हा भीषण रस्ता अपघात झाला आहे. (16 soldiers martyred as army vehicle overturned in Sikkim, truck fell into deep gorge)

अधिक वाचा : IPL Auction 2023 LIVE updates: सॅम करन ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा प्लेअर

या अपघातात भारतीय लष्कराचे १३ जवान आणि तीन ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) शहीद झाले आहेत. या भीषण अपघाताबाबत भारतीय लष्कराने एक निवेदन जारी केले आहे. लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'उत्तर सिक्कीममधील गेमा येथे लष्कराच्या ट्रकला अपघात झाला. या अपघातात 16 लष्करी जवानांचा मृत्यू झाला. तर चार जवान जखमी झाले आहेत. एका तीव्र वळणावर लष्कराचे वाहन उतारावरून घसरल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. 

अधिक वाचा : Nasal Vaccine : इंजेक्शनऐवजी येणार 'दोन थेंब' डोस ; भारत बायोटेकच्या Nasal व्हॅक्सीनला मंजूरी


सिक्कीममधील या भीषण रस्ते अपघाताने देश हादरला आहे. सिक्कीमच्या उत्तरेकडील भागात झालेल्या भीषण अपघातावर तीव्र दुःख व्यक्त करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, 'उत्तर सिक्कीममधील रस्ता अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांच्या हौतात्म्याने खूप दुःख झाले. त्या जवानांच्या सेवा आणि समर्पणाबद्दल देश कृतज्ञ आहे. शहीदांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना. या दुर्घटनेत जखमी झालेले जवान लवकरात लवकर बरे व्हावेत अशी माझी इच्छा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी