Murder for Study : 16 वर्षाच्या मुलाने केला 13 वर्षांच्या मित्राचा खून, कारण ऐकून बसेल शॉक

किरकोळ कारणासाठी दहावीतील मुलाने आपल्या सातवीतील मित्राचा खून केल्याची घटना समोर आली आहे. त्याच्या कारणामुळे तर सर्वांनाच धक्का बसला आहे.

Murder for Study
दहावीतील मुलाने केली 13 वर्षांच्या मित्राची हत्या  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दहावीतील मुलाने आपल्या मित्राचा केला खून
  • अभ्यासापासून वाचण्यासाठी गळा आवळून खून
  • कारण ऐकून सर्वांनाच बसला धक्का

Murder for Study : दहावीच्या वर्गात (10th Std) शिकणाऱ्या एका मुलाने (Student) त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान असणाऱ्या एका मुलाची निर्घृण हत्या (Murder) केली. रस्त्यावर पडलेला त्याचा मृतदेह जेव्हा येणाजाणाऱ्या नागरिकांनी पाहिला, तेव्हा त्यांनी त्याची कल्पना पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला असता दहावीत शिकणाऱ्या मुलाने या 13 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचं दिसून आलं. दिल्लीजवळच्या गाझीयाबादमध्ये ही घटना घडली. दहावीतील मुलाने त्याच्या मित्राची गळा दाबून हत्या गेली आणि बिअरच्या बाटलीच्या काचेने त्याचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला. 

कारण ऐकून बसला शॉक

दहावीत शिकणाऱ्या या अल्पवयीन आरोपीला अभ्यास करण्याचा कंटाळा होता. त्याला अभ्यासात बिलकूल गती नव्हती आणि अभ्यासाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी तो काही नवे मार्ग शोधत होता. त्यातून त्याला खून करण्याची कल्पना सुचली. एखादा खून करून पोलिसांना शरण यावं. त्यानंतर तुरुंगात जावं म्हणजे आपल्याला अभ्यास करावा लागणार नाही, असा विचार मनाशी करून त्याने आपल्याच शाळेतील आपल्या मित्राचा खून केला. 

अशी घडली घटना

गाझीयाबादजवळ असणाऱ्या मसुरी परिसरात राहणाऱ्या आणि दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने काही दिवसांपूर्वीच सातवीत शिकणाऱ्या एका मुलाशी ओळख करून घेतली होती. त्याचा खून करण्याचा इराद्यानेच त्याने मुलाशी ओळख वाढवली. काही दिवसांनी दोघं हायवे परिसरात फिरायला जाऊ लागले. आपल्याला अभ्यासातून वाचण्यासाठी तुरुंगात जाणं परवडेल, असा विचार त्याने केला होता. त्यासाठी त्याने आपल्या मित्राला मारून टाकण्याची तयारी केली. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे फिरायला गेल्यानंतर त्याने अचानक मित्रावर हल्ला चढवला आणि त्याचा गळा आवळून त्याला मार मारलं. त्यानंतर बिअरच्या बाटलीच्या काचेनं त्याच्या गळ्यावर वार केले. यात या मुलाचा मृत्यू झाला. 

अधिक वाचा - Murder Mystery : झाडावर लटकलेल्या चपलेनं उलगडलं खुनाचं रहस्य, थरकाप उडवणारी मर्डर मिस्ट्री

नागरिकांना दिसला मृतदेह

सातवीतील मुलाचा मृतदेह रस्त्यातच टाकून तो तिथून निघून गेला. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यावर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला. मरण पावलेल्या मुलाचं नाव विनोद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोघांनाही अनेकदा काही लोकांनी एकत्र फिरताना पाहिलं होतं. गेल्या दोन तीन दिवसांपासून दोघंही या परिसरात येऊन काही वेळ अभ्यासही करत बसायचे. त्यानंतर एका दिवशी दहावीतील मुलाने सातवीतील मित्राचा खून केला. 

अधिक वाचा - Maharashtra Political Crisi : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग, पुढील सुनावणी गुरूवारी

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी खुनी मित्राला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोस्टमॉर्टेम रिपोर्टची पोलीस वाट पाहत आहेत. मात्र आपल्या सख्ख्या मित्राचा केवळ अभ्यासातून वाचण्यासाठी खून झाल्याची घटना समजल्यावर संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी