Shawarma : शॉरमा खाल्ल्यामुळे शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू, १८ जण रुग्णालयात दाखल

केरळमध्ये शॉरमा खाल्ल्यानंतर एका शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. तसेच १८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शॉरमा खाल्ल्यानंतर सर्वजणांना विषबाधा झाली. त्यामुळे सर्व जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात एका १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. देवनंदा असे या मृत मुलीचे नाव आहे.

chicken Shawarma
चिकन शॉरमा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • केरळमध्ये शॉरमा खाल्ल्यानंतर एका शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.
  • तसेच १८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
  • शॉरमा खाल्ल्यानंतर सर्वजणांना विषबाधा झाली.

Shawarma Food Poisining : तिरुवनंतपुरम : केरळमध्ये शॉरमा खाल्ल्यानंतर एका शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. तसेच १८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शॉरमा खाल्ल्यानंतर सर्वजणांना विषबाधा झाली. त्यामुळे सर्व जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात एका १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. देवनंदा असे या मृत मुलीचे नाव आहे. 

अधिक वाचा : School Fee : पालकांच्या खिश्यावरील भार झाला कमी; फीमध्ये 15 टक्के सवलत देण्याचे शाळांना आदेश

मिळालेल्या माहितीनुसार देवनंदा ही ट्युशनमध्ये गेली होती. तेव्हा ट्युशनजवळ असलेल्याअ एका ज्युसच्या दुकानातून तिने शॉरमा खाल्ला. त्यानंतर तिची प्रकृती ढासळली. देवनंदासह अनेक विद्यार्थ्यांनी इथला शॉरमा खाल्ला होता. त्यापैकी १८ जणांना अन्नातून विषबाधा झाली. तातडीने सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा उपचारादरम्यान देवनंदाचा मृत्यू झाला. 

अधिक वाचा : Local trains fares | मुंबईतील लोकल ट्रेनच्या एसी, फर्स्ट क्लासच्या भाड्यात कपात...ऐन उकाड्यात घ्या एसीच्या गारव्याचा आनंद, पाहा नवे तिकिटदर

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व १८ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी ज्युस सेंटरच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण ज्युस सेंटर बंद करण्यात आले असून सील करण्यात आले आहे. 

अधिक वाचा : Amruta Fadnavis: या मराठी अभिनेत्रीने दिली अमृता फडणवीसांना दिली म्हशीची उपमा 


या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून राज्यातील प्रत्येक हॉटेल, रेस्टॉरेंटमधी अन्नाच्या दर्जाची तपासणी होईल असा असे आदेश दिले आहेत. तसेच राज्य सरकार प्रत्येक छोट्या मोठ्या दुकानातही अन्नाचे परीक्षण करणार आहे. 
अधिक वाचा : Loudspeaker Row : रस्त्यावरील नमाज पठण बंदी केल्यानंतर गणेशोत्सव आणि दहीहंडीचे काय? ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंचा सवाल

शॉरमा हे सध्या लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. लहान मुलांना हे स्ट्रीट फूड विशेष आवडतं. शॉरमा हा अरबी पदार्थ असून एका मैद्याच्या चपातीत चिकनचे तुकडे, सलाड, मेओनीज आणि सेझवान चटणी त्यात घातली जाते. अनेक ठिकाणी रस्त्यांवर तसेच फास्ट फूड रेस्टॉरेंट्समध्ये शॉरमा चिकने स्टॉल हमखास दिसतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी