आईच्या मृत्यूनंतर १५ वर्षीय मुलीवर १७ लोकांनी ५ महिने केला बलात्कार

लोकल ते ग्लोबल
Updated Feb 03, 2021 | 18:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल १७ लोकांनी पाच महिन्यांपर्यंत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

rape
१५ वर्षीय मुलीवर १७ लोकांनी ५ महिन्यांपर्यंत केला बलात्कार 

थोडं पण कामाचं

  • ५ महिन्यांपासून केला जात होता बलात्का
  • तीन वर्षापूर्वी झाले होते आईचे निधन
  • पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू

मुंबई: कर्नाटकच्या(karnataka) चिकमंगळूर जिल्ह्यात माणुसकी आणि नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलींचे तिच्या आईच्या निधनानंतर तब्बल ५ महिने लैंगिक शोषण(rape) करण्यात आले. तिला या दलदलीत ढकलणारा दुसरा तिसराकोणी नसून तिचा नातेवाईकचहोता. पोलिसांना जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने आरोपींविरोधात कारवाई सुरू केली आणि अटक करण्यास सुरूवात केली. 

न्यूज एजन्सी पीटीआयनुसार पाच महिन्यांपर्यंत१५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाखील आठ लोकांना अटक करण्यात आली. तर इतर नऊ आरोपींचा शोध घेतला जात आहे. 

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शृंगेरी पोलिसांनी ज्या आरोपींना अटक केली आहे त्यात मुलीचे नातेवाईकही सामील आहेत. जे तिला वेश्याव्यवसायात ढकलत होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही त्या मुलीच्या नातेवाईकासह आठ लोकांना अटक केली ज्यांनी तिला वेश्याव्यवसायात ढकलण्यास प्रवृत्त केले. मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या इतर ९ जणांचा शोध घेतला जात आहे. 

व्हिडिओ बनवून तिला केले ब्लॅकमेल

पोलिसांच्या माहितीनुसार, तीन वर्षाआधी आपल्या आईच्या मृत्यूनंतर ही मुलगी आपल्या चिकम्मासोबत राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून ती एका ठिकाणी काम करत होती. यादरम्यान तिची ओळख एका बस चालकाशी झाली. या बस चालकाने तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर त्याच्या साथीदारांनीही या मुलीवर बलात्कार केला. तसेच व्हिडिओ बनवले आणि तिला ब्लॅकमेलही केले.

आरोपींवर गुन्हे दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांतर्गत या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी