Owaisi Criticized Modi Government  :  १८ वर्षाची मुलगी सेक्स करू शकते पण लग्न नाही, खासदार ओवैसींची केंद्र सरकारवर टीका

नुकतंच केंद्र सरकारने मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ केले आहे. यावरून एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी  टीका केली आहे.  १८ वर्षाची मुलगी सेक्स करू शकते पण लग्न करू शकत नाही अशी टीका ओवैसी यांनी केली आहे. 18 year old girl can do sex but no marriage mp asaduddin owaisi criticized modi government

asaduddin owaisi
असादुद्दीन ओवैसी 
थोडं पण कामाचं
  • नुकतंच केंद्र सरकारने मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ केले आहे.
  • यावरून एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी  टीका केली आहे.  
  •  १८ वर्षाची मुलगी सेक्स करू शकते पण लग्न करू शकत नाही

Owaisi Criticized Modi Government : लखनौ :  नुकतंच केंद्र सरकारने मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ केले आहे. यावरून एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी  टीका केली आहे.  १८ वर्षाची मुलगी सेक्स करू शकते पण लग्न करू शकत नाही अशी टीका ओवैसी यांनी केली आहे. लग्नासंबंधी पंतप्रधान मोदींना काय समस्या आहे असेही ओवैसी म्हणाले. (18 year old girl can do sex but no marriage mp asaduddin owaisi criticized modi government)

मेरठमध्ये एका सभेत बोलताना ओवैसी म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये १९ टक्के मुस्लिम समाज आहे. आपल्या समाजाने राजकीय ताकद दाखवून नेतृत्व मिळवले पाहिजे, त्यानंतरच आपल्या तरुणांना योग्य सन्मान, शिक्षण मिळेल. आपल्या समाजासोबत अत्याचार आणि भेदभाव होणार नाही.   मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१ केल्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका करताना ओवैसी म्हणाले की, आता केंद्र सरकारने मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ वर्ष क्ली आहे. कायद्यानुसार १८ वर्षाची मुलगी सेक्स करू शकते परंतु लग्न नाही करू शकत. लग्नाबाबत मोदींना काय अडचण आहे? आता म्हणतील की मोदीजी मुस्लिम आणि महिलांच्या कल्याणाबाबत काही बोलत नाहीत. तुम्ही काय आमचे काका आहात का? काका फक्त प्रश्न विचारत बसले आता काका म्हणतात लग्न करू नका असेही ओवैसी म्हणाले.  

एमआयएमने उत्तर प्रदेश निवडणूकीसाठी कंबर कसली आहे. ओवैसी यांनी राज्यात १०० ठिकाणी उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले आहे. शनिवारी त्यांनी मेरठमध्ये मोठी सभा घेतली. काही दिवसांपूर्वी ओवैसी यांची नौचंदी मैदानात सभार होणार होती, परंतु प्रशासनाने त्यांना सभा घेण्यासाठी नकार दिला होता.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी