Unnao Nurse Murder : रुग्णालयाच्या बाहेर आढळला नर्सचा मृतदेह, कुटुंबीयांकडून बलात्कार झाल्याचा दावा, पोस्टमॉर्टम अहवालात आली धक्कादायक माहिती 

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नोकरीच्या पहिल्याच दिवशी एका नर्सचा मृतदेह रुग्णालयाच्या आवारात आढळला आहे. आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा दावा मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी या तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

unnao nurse murder
उन्नाव, नर्स हत्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उत्तर प्रदेशमध्ये नोकरीच्या पहिल्याच दिवशी एका नर्सचा मृतदेह रुग्णालयाच्या आवारात आढळला आहे.
  • आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा दावा मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
  • पोलिसांनी या तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

Unnao Nurse Murder : लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नोकरीच्या पहिल्याच दिवशी एका नर्सचा मृतदेह रुग्णालयाच्या आवारात आढळला आहे. आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा दावा मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी या तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात एका नर्सिंग होमध्ये एक तरुणी आज सोमवारपासून कामावर रुजू झाली होती. परंतु आज नर्सिंग होमच्या आवारात या नर्सचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. हा मृतदेह पाहून लोक गोळा झाले आणि या मृतदेहाचे फोटो काढू लागले. हा हा म्हणता ही बातमी वार्‍यासारखी संपूर्ण भागात पसरली. कुटुंबीयांबा याबाबत कळाले तेव्हा त्यांच्या पायाखालील जमीनच सरकली. आपल्या मुलीवर सामूहिक  बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा दावा मृत तरुणींच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

तर त्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला. तसेच तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर सर्वांना धक्का बसला. शवविच्छेदनाच्या अहवालात तरुणीवर बलात्कार झालाच नसल्याचे निष्पण्ण झाले. असे असले तरी आपल्या मुलीवर बलात्कारच झाल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी