1993 Mumbai Blast : नवी दिल्ली : मुंबईत १९९३ साली झालेल्या मालिका स्फोटातील (mumbai 1993 blast ) आरोपी सलीम गाझीचा (accused salim gazi) शनिवारी पाकिस्तानच्या (pakistan) कराची (karachi) शहरात मृत्यू झाला. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. सलीम गाझी दाऊद इब्राहीमच्या (dawood ibrahim) टोळीतील असून तो छोटा शकीलचा (chota shakeel) जवळचा साथीदार होता. गेल्या काही दिवसांपासून सलीम आजारी होता. सलीम गाझी मुंबई स्फोटातील मोठा आरोपी होता. परंतु स्फोटानंतर दाऊद आणि इतर साथीदारांसह पळून जाण्यात तो यशस्वी झाला होता. पोलिसांपासून वाचण्यासाठी सलीम सतत पळत होता. (1993 mumbai blast accused salim gazi died in karachi pakistan)
The most wanted 1993 serial blast accused Salim Gazi, a member of the Dawood gang and close aide of Chota Shakeel died on Saturday in Karachi, Pakistan: Mumbai Police Sources — ANI (@ANI) January 16, 2022
सलीम अनेक वर्षे दुबईत राहत होता, नंतर तो पाकिस्तानमध्ये स्थायिक झाला आणि छोटा शकील सोबत आपले बेकायदेशीर धंदे करत होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलीमला अनेक दिवसांपासून उच्च रक्तबाद आणि इतर आजारांनी ग्रस्त होता. मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते, हृदय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. मुंबई स्फोटात सलीम गाझीसह दाऊद इब्राहीम, छोटा शकील आणि टायगर मेमन त्याच्या कुटुंबीयांचा हात होता.
यापूर्वी दाऊदचा जवळचा साथीदार फहीम मछमछचा कोरोनामुळे कराचीतच मृत्यू झाला होता. फहीम हा दाऊदचा साथीदार होता आणि त्याला मागच्या वर्षी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. फहीम विरोधात खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीसारख्या गंभीर गुन्हे दाखल होते. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. तो अनेक वर्ष पाकिस्तानात लपला होता. अखेर ऑगस्ट २०२१ मध्ये त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला.