व्हाइट हाऊसमध्ये 'या' २० भारतवंशियांचा बोलबाला, पाहा कुणाला मिळणार कोणती जबाबदारी 

Jo Biden swearing in: अमेरिकेच्या इतिहासातील प्रथमच राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी इतक्या मोठ्या संख्येने भारतीय-अमेरिकन नागरिकांना त्यांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

20 indians dynasties
व्हाइट हाऊसमध्ये 'या' २० भारतवंशियांचा बोलबाला  |  फोटो सौजन्य: Twitter

वॉशिंग्टन: जो बायडेन (Joe biden) हे उद्या अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष (President) म्हणून शपथ घेणार आहेत. अमेरिकेच्या (USA) या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या प्रशासनाची एक टीम तयार केली आहे. विशेष गोष्ट अशी की, व्हाइट हाऊस प्रशासनातील कमीतकमी २० महत्त्वाच्या पदांवर भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांना नियुक्त केले जाणार आहे. त्यांच्यामध्ये सुमारे १३ महिलांचा समावेश आहे. जे महत्त्वाच्या पदांवर दिसतील. बायडेन प्रशासनात इतक्या मोठ्या संख्येने भारतीय वंशाच्या लोकांची नेमणूक हा एक विक्रम ठरणार आहे. यापैकी भारतीय वंशाचे १७ अमेरिकन नागरिक व्हाईट हाऊसचे प्रशासन पाहतील.

उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणाऱ्या कमला हॅरिस (56 वर्षीय)  या भारतीय वंशाच्या पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन नागरिक असणार आहेत. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच असे घडले आहे की इतक्या मोठ्या संख्येने भारतीय-अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी त्यांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. चला तर एक नजर टाकूयात त्या भारतीय वंशाच्या लोकांवर जे भविष्यात बायडे सरकारचं कामकाज संभाळताना दिसतील.

 1. नीरा टंडन- बायडेन सरकारमध्ये नीरा टंडनवर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. टंडन यांना व्हाइट हाऊस कार्यालयाचे व्यवस्थापन व अर्थसंकल्प संचालक केले गेले आहे.
 2. विवेक मूर्ती- अमेरिकेचे सर्जन जनरल.
 3. वनिता गुप्ता- सहकारी न्याय विभाग
 4. उजरा झेया- नागरी सुरक्षा, लोकशाही, मानवाधिकार यांचे सचिव.
 5.  माला अडीगा- बायडेन यांची पत्नी जिलच्या धोरण संचालक
 6. गरिमा वर्मा- जिल बायडेन यांच्या कार्यालयाच्या डिजिटल संचालक
 7. सबरीना सिंग- जिल बायडेन यांच्या डेप्युटी प्रेस सचिव.
 8. आयशा शाह- व्हाईट हाऊस डिजिटल स्ट्रॅटेजीची भागीदार व्यवस्थापक
 9. समीरा फजिली- यूएस नॅशनल इकॉनॉमिक कौन्सिलमध्ये उपसंचालक
 10. भरत राममूर्ती- व्हाइट हाऊस राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे उपसंचालक
 11. गौतम राघवन- व्हाइट हाऊस प्रेसिडेंशियल पर्सनल डिपार्टमेंटचे उपसंचालक
 12. विनय रेड्डी- संचालक भाषण लिखाण
 13. वेदांत पटेल- राष्ट्राध्यक्षांचे सहाय्यक प्रेस सचिव
 14. तरुण छाबरा - तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षेचे वरिष्ठ संचालक
 15. सुमोना गुहा - दक्षिण आशियासाठी वरिष्ठ संचालक
 16. शांती कलाथिल - लोकशाही आणि मानवी हक्क संयोजक
 17. सोनिया अग्रवाल - हवामान धोरण वरिष्ठ सल्लागार
 18. विदूर शर्मा- कोविड प्रतिसाद कार्यसंघातील धोरण सल्लागार
 19. नेहा गुप्ता- व्हाइट हाऊस येथे असोसिएट कौन्सिल
 20. रीमा शाह- व्हाइट हाऊस येथे डेप्युटी असोसिएटेड कौन्सिल

बायडेन यांनी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान आश्वासन दिले होते की ते अध्यक्ष झाल्यावर मोठ्या संख्येने भारतीय-अमेरिकन नागरिकांना त्यांच्या प्रशासनात समाविष्ट करतील. आता त्यांनी दिलेलं वचन ते पाळत असल्याचं दिसत आहे. व्हाइट हाऊस प्रशासनात भारतीय वंशाच्या इतक्या मोठ्या संख्येने लोकांचे आगमन हे दर्शविते की या समुदायाने  सेवा क्षेत्रात जे योगदान दिले आहे त्यास एक ओळख मिळाली आहे. बायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या नागरिकांव्यतिरिक्त दक्षिण आशियातील तीन लोकांनाही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी-अमेरिकन नागरिक असलेल्या अली जैदी यांची व्हाइट हाऊसमध्ये उप-राष्ट्रीय हवामान सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रोहिणी कोसोग्लू हे श्रीलंकेचे अमेरिकन आहेत. उपराष्ट्रपतींचे ते देशांतर्गत धोरण सल्लागार आहेत तर बांगलादेशी वंशाचे जयन सिद्दीकी यांना व्हाइट हाऊसचे डिप्टी चीफ ऑफ स्टाफचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी