नवी दिल्ली: भारतात २० लाख २९ हजार ४८० जणांना कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी लसचा पहिला डोस देण्यात आला. लसमुळे शरीरात कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रतिकार शक्ती विकसित करणारी प्रक्रिया सुरू होईल. लसचा दुसरा डोस घेण्यासाठी कधी यायचे हे संबंधितांना विशिष्ट नंबरवरुन मेसेज करुन कळवले जाईल. (20,29,480 people vaccinated in India)
ताज्या आकडेवारीनुसार भारतात सध्या १ लाख ७६ हजार ४९८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १ कोटी ३ लाख ५९ हजार ३०५ झाली आहे. कोरोनामुभारतात २० लाख २९ हजारांपेक्षा जास्त जणांना दिला कोरोना लसचा पहिला डोस
ळे देशात आतापर्यंत १ लाख ५३ हजार ७२४ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात १ कोटी ६ लाख ८९ हजार ५२७ जणांना कोरोनाची बाधा झाली.
मागील २४ तासांमध्ये १२ हजार ६८९ नवे कोरोना रुग्ण आढळले तसेच १३ हजार ३२० जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे देशात मागील २४ तासांमध्ये १३७ मृत्यू झाले. देशाचे कोरोनामुक्तीचे प्रमाण ९६.९१ टक्के आहे तर कोरोनाच्या अॅक्टिव्ह केसचे प्रमाण १.६५ टक्के आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण १.४४ टक्के आहे.
आतापर्यंत देशात १९ कोटी ३६ लाख १३ हजार १२० कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी ५ लाख ५० हजार ४२६ कोरोना चाचण्या प्रजासत्ताक दिनी झाल्या. भारतातील १ लाख ७६ हजार ४९८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांपैकी ७१ हजार ८४३ रुग्ण फक्त केरळ या एकाच राज्याचे आहेत.
भारतात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. कोविशिल्ड या पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या संस्थेने तयार केलेल्या तसेच कोवॅक्सिन या भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या लसद्वारे लसीकरण सुरू आहे. भारतीय बाजारात खुल्या विक्रीसाठी कोवॅक्सिन ही लस ९०० ते एक हजार रुपये या दराने मार्च २०२१ पासून उपलब्ध होणार आहे. तसेच कोविशिल्ड लस ऑगस्ट २०२१ पासून एक हजार रुपये दराने बाजारात उपलब्ध होणार आहे. खुली विक्री सुरू झाल्यावर १८ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकाला लस खरेदी करुन डॉक्टरांच्या मदतीने लसीकरण करुन घेता येईल. विक्री सुरू झाल्यामुळे ज्यांना लवकर लस मिळणार नाही पण लसीकरण करुन घेण्याची इच्छा आहे त्यांची सोय होणार आहे.
भारताची लोकसंख्या १३८ कोटींपेक्षा जास्त आहे. यातील १८ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांची संख्या ९० कोटींपेक्षा जास्त आहे. कोरोनाची लस आधी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना तसेच फ्रंटलाइन वर्करना नंतर ज्येष्ठांना देण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे सर्वांना लवकर लस मिळणे कठीण आहे. लसीकरणाचा पहिला टप्पा सहा ते सात महिने चालणार आहे. पुढील कार्यक्रम जाहीर झालेला नाही. लसीकरण सुरू असले तरी अद्याप केंद्र सरकारला अपेक्षित असलेल्या वेगाने मोहीम सुरू झालेली नाही. याच कारणामुळे नागरिकांना वारंवार लस घेण्याचे आवाहन सुरू आहे. लस टोचून घेतल्यामुळे देशात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. ज्यांचा लस घेतल्यानंतर मृत्यू झाला त्यांच्या मत्यूचे कारण लस नाही, असेही सरकारने जाहीर केले.
मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेतल्यानंतर तसेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांचे पालन करुन लस वापरण्याचा निर्णय झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. लस बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केंद्र सरकारने नागरिकांना केले आहे.