कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले, पाहा महाराष्ट्रातील आकडा काय 

corona positive patients: देशात मागील २४ तासात २२२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात २०,३४६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण १,०३,९५,२७८ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 

corona patients
कोरोना रुग्ण संख्या  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • देशातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट
  • देशात आतापर्यंत कोरोना १ कोटी ३ लाखांहून अधिक लोकांना लागण  
  • गेल्या २४ तासात देशात २२२ रुग्णांचा मृत्यू

मुंबई: Coronavirus india total cases 7 january 2021: गेल्या २४ तासात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढली आहे.  देशात २० हजाराहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांचा हा आकडा आज पुन्हा वाढला आहे. दरम्यान, आज काही प्रमाणात अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात देशभरात १९,५८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

दरम्यान आतापर्यंत १ कोटी ३ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासात देशात २०,३४६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. (Corona Positive) तर देशात २२२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Corona Patient Death) सध्या देशभरात २ लाख २८ हजार अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patients)आहेत. 

आतापर्यंत देशात एकूण १ लाख ५० हजाराहून अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा १ कोटी ३ लाखांच्या पुढे गेलेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात एकूण १,०३,९५,२७८ रुग्ण सापडले आहेत. (India total corona patients) त्यापैकी १,५०,३३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण:

S. No. Name of State/UT Active Cases* Discharged* Deaths*
1 Andaman and Nicobar Islands 28 4859 62
2 Andhra Pradesh 2896 873855 7125
3 Arunachal Pradesh 88 16609 56
4 Assam 3039 212328 1057
5 Bihar 4184 248410 1420
6 Chandigarh 256 19525 323
7 Chhattisgarh 9109 273030 3447
8 Dadra and Nagar Haveli and Daman and Diu 5 3372 2
9 Delhi 4481 613246 10625
10 Goa 870 49893 744
11 Gujarat 8594 236323 4329
12 Haryana 2672 258281 2934
13 Himachal Pradesh 1281 53782 952
14 Jammu and Kashmir 2459 117690 1900
15 Jharkhand 1449 113545 1040
16 Karnataka 9196 902817 12124
17 Kerala 65252 722421 3209
18 Ladakh 219 9243 127
19 Madhya Pradesh 8516 233862 3670
20 Maharashtra 51969 1852759 49825
21 Manipur 479 27642 363
22 Meghalaya 154 13230 141
23 Mizoram 88 4160 8
24 Nagaland 137 11737 80
25 Odisha 2026 327008 1887
26 Puducherry 372 37327 635
27 Punjab 2998 159500 5412
28 Rajasthan 7698 300690 2723
29 Sikkim 464 5358 129
30 Tamil Nadu 7665 803328 12188
31 Telengana 5053 282177 1559
32 Tripura 64 32843 387
33 Uttarakhand 3515 87529 1549
34 Uttar Pradesh 11939 569959 8441
35 West Bengal 8868 538521 9863
Total# 228083 10016859 150336

देशात आतापर्यंत १,००,१६,८५९ रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या २,२८,०८३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रात नेमकी स्थिती काय?

राज्यात मागील २४ तासात ४,३८२ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १९,५४,५५३ एवढी झाली आहे. तर काल एका दिवसात २,५७० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १८,५२,७५९ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

राज्यात एकूण ५१,९६९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, काल एका दिवसात ६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ४९,८२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी