2135 omicron patients : भारतात २१३५ ओमायक्रॉन रुग्ण आढळले

05 January 2022 omicron covid 19 cases in India : भारतात आतापर्यंत २ हजार १३५ ओमायक्रॉनबाधीत रुग्ण आढळले. यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. सर्वाधिक रुग्ण असलेल्या राज्यांच्या यादीत दिल्ली दुसऱ्या स्थानी आहे. 

2135 omicron patients were found in India
भारतात २१३५ ओमायक्रॉन रुग्ण आढळले 
थोडं पण कामाचं
  • भारतात २१३५ ओमायक्रॉन रुग्ण आढळले
  • बुधवारी देशात ५८ हजार ९७ नव्या कोरोना रुग्णांची आणि ५३४ कोरोना मृत्यूची नोंद
  • मागील आठ दिवसांत भारतातील कोरोना रुग्णांमध्ये ६.३ पटीने वाढ

2135 omicron patients were found in India : नवी दिल्ली : भारतात आतापर्यंत २ हजार १३५ ओमायक्रॉनबाधीत रुग्ण आढळले. यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. सर्वाधिक रुग्ण असलेल्या राज्यांच्या यादीत दिल्ली दुसऱ्या स्थानी आहे. 

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, केरळ, तामीळनाडू, कर्नाटक, झारखंड आणि गुजरात या राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. देशातील २८ जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे. बुधवारी देशात ५८ हजार ९७ नव्या कोरोना रुग्णांची आणि ५३४ कोरोना मृत्यूची नोंद झाली. मंगळवारी देशात ३७ हजार ३७९ नव्या कोरोना रुग्णांची आणि १२४ कोरोना मृत्यूची नोंद झाली. 

कोरोना विषाणूचा नवा अवतार असलेल्या ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने पसरत आहे. यामुळे नियमानुसार आपले लसीकरण पूर्ण करणे तसेच कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे. मास्क लावणे हा कोरोना संकटाला प्रतिबंध करण्याचा एक उपाय आहे;  असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. ज्यांना खबरदारीचा उपाय म्हणून लसचा तिसरा डोस घेण्यास सांगितले आहे अशा पात्र नागरिकांनी नियमानुसार हा डोस घ्यावा; असेही आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे. 

ज्या नागरिकांना कोविशल्डचे दोन डोस टोचले आहेत त्यांना तिसरा डोस पण कोविशिल्डचाच घ्यायचा आहे. तसेच ज्या नागरिकांना कोवॅक्सिनचे दोन डोस टोचले आहेत त्यांना तिसरा डोस पण कोवॅक्सिनचाच घ्यायचा आहे; असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. 

मागील आठ दिवसांत भारतातील कोरोना रुग्णांमध्ये ६.३ पटीने वाढ झाली आहे. ४ जानेवारी २०२२ रोजी संपलेल्या आठवड्यात जगभरात २५.२ लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली. ही कोरोना संकट सुरू झाल्यापासून एका आठवड्यात नोंद झालेली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यापैकी ६५ टक्के रुग्ण अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली आणि स्पेन या देशांतील आहेत. ओमायक्रॉनमुळे जगभरात आतापर्यंत १०८ मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या ओमायक्रॉनचे संकट प्रामुख्याने शहरी भागांमध्ये आहे. 

ओमायक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टंस राखणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्क घालणे, कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे आणि पात्र व्यक्तींनी नियमानुसार लसीकरण पूर्ण करुन घेणे हे शक्य असलेले उपाय आहेत. गर्दी होईल असे कार्यक्रम टाळून संसर्गला प्रतिबंध करणे शक्य आहे; असे आयसीएमआरचे महासंचालक डॉक्टर बलराम भार्गव यांनी सांगितले.

मुलांनी पॅरासिटामॉल गोळी घेऊ नये!

काही लसीकरण केंद्रांवर कर्मचाऱ्यांकडून मुलांची आणि त्यांच्या पालकांची दिशाभूल केली जात आहे. या प्रकरणाची केंद्रीय आरोग्य विभागाने दखल घेतली आहे. १५ ते १८ या वयोगटातील ज्या मुलांनी कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे त्यांनी पॅरासिटामॉल किंवा पेन किलर गोळी घेऊ नये. चाचणी दरम्यान ३० हजार पैकी जेमतेम दहा ते वीस टक्के जणांचीच तब्येत लस घेतल्यावर थोडी खालवली होती. पण एक-दोन दिवसांच्या विश्रांतीने त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली. त्यांना औषधांची गरज भासली नाही. यामुळे कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या मुलांनी पॅरासिटामॉल किंवा पेन किलर गोळी घेऊ नये. लस घेतल्यानंतर त्रास झाला तर आपल्या डॉक्टरांच्या (जनरल फिजिशियन) सल्ल्याने उपचार घ्यावे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी