Car thief: ४ गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी तरुण चोरायचा नव्या कार 

लोकल ते ग्लोबल
Updated Mar 30, 2019 | 15:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

car thief चार-चार गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्याचा नादात एका २२ वर्षीय तरुणाने अनेक गाड्या चोरल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

car thief_Indiatimes
Car thief: ४ गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी तरुण चोरायचा नव्या-नव्या कार (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: Indiatimes

गुरुग्राम: नवी दिल्लीजवळील गुरुग्राम येथे पोलिसांनी गुरुवारी एका २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. हा आरोपी तरुण दिल्ली आणि गुरुग्राम येथे गाड्या चोरायचा. त्याने आजपर्यंत अनेक गाड्या चोरल्याचं आता समोर आलं आहे. आरोपीचं नाव सचिन असं असल्याचं समजतं आहे. तो लोकांना बोलण्यात गुंगवून त्यांच्या गाड्या चोरुन पळून जायचा. पण हे सारं काही तो कशासाठी करायचा माहितेय का? तो हे करायचं ते म्हणजे आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी... तेही एका गर्लफ्रेंड नाही बरं का... ४-४ गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी हा तरुण असे उद्योग करायचा. अखेर पोलिसांनी या प्रेमवीराला अटक केल्यानंतर सगळा मामला समोर आला आहे. 

आरोपी सचिन याला एप्रिल २०१८ मध्ये देखील गाडी चोरल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पण तीन महिने जेलमध्ये राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की, मागील वर्षी जेलमधून बाहेर आल्यानंतर आरोपीने पुन्हा गुरुग्राम येथून ७ आणि दिल्ली येथून १ कार चोरली होती. गुरुग्राम आणि दिल्ली अशा दोन्ही ठिकाणी सचिनविरुद्ध गाडी चोरीच्या तब्बल ३० तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. अखेर अनेक तक्रारींनतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. 

हिंदुस्तान टाइम्सला पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये असं म्हटलं आहे की,  'बुधवारी रात्री आरोपी सचिन याला गुरुग्रामच्या राजोक्री या परिसरातून अटक करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यावेळेस आरोपीने पोलिसांना असं सांगितलं की, त्याला नव्या-नव्या गाड्या चालविण्याच भलताच शौक आहे. तसंच चार गर्लफ्रेंडला इम्पेस करण्यासाठी मी या गाड्या चोरी करायचो.' 
याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देताना असं सांगितलं की, 'आरोपी सचिन हा लोकांना बोलण्यात गुंतवून ठेवायचा आणि त्यांच्या गाड्यांच्या चाव्या चोरायचा. त्यानंतर पार्किंग एरियामधून तो त्याच गाड्या अगदी बेमालूमपणे घेऊन जायचा. 

एकदा आरोपी सचिन हा एका डॉक्टरकडे तपासणीसाठी गेला होता. ज्यावेळी डॉक्टर त्याला तपासत होते. तेव्हाच त्याने डॉक्टरांच्या गाडीची चावी चोरली. त्यानंतर त्याने त्या डॉक्टरची कार चोरून नेली. आरोपीने हॉटेल आणि हॉस्पिटल पार्किंगमधून अनेक गाड्या चोरल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी आरोपी सचिन याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी