देशात ७ लाख पॉझिटिव्ह रुग्ण, महाराष्ट्रातील नेमका आकडा किती? 

corona positive patients total Patients:देशात मागील २४ तासात तब्बल ४६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात २२२५२ नवे रुग्ण सापडले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण ७,१९,६६५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 

corona patients
देशात कोरोनाचे ७ लाखांहून अधिक रुग्ण (फोटो सौजन्य: iStock Images) 

थोडं पण कामाचं

  • देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ
  • देशात आता कोरोना रुग्णांची संख्या ७ लाख १९ हजारांच्यावर  
  • गेल्या २४ तासात देशात ४८७ जणांचा मृत्यू

मुंबई: Coronavirus india total cases today: देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा ७ लाखांच्या वर गेला आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मागील २४ तासात देशभरात तब्बल २२,२५२ रुग्ण सापडले आहेत. तर मागील काही दिवसात मृतांचा आकडा देखील वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, मागील २४ तासात देशात तब्बल ४६७ रुग्णांचा मृत्यू (Positive Patient Death) झाला आहे. 

भारतात आतापर्यंत एकूण २० हजारांहून जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा ७ लाख १९ हजारांच्या देखील पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात एकूण ७,१९,८८५ रुग्ण सापडले आहेत. (India total corona patients) त्यापैकी २०,१६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात आतापर्यंत ४,३९,९४८ रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या २,५९,५५७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण: 

क्रमांक राज्य उपचार घेत असलेले रुग्ण* बरे झालेले रुग्ण* मृत्यू* एकूण रुग्ण*
1 अंदमान आणि निकोबार 67 74 0 141
2 आंध्रप्रदेश 10860 8920 239 20019
3 अरुणाचल प्रदेश 176 92 2 270
4 आसाम 4264 7882 14 12160
5 बिहार 3031 8997 97 12125
6 चंदीगड 82 401 6 489
7 छत्तीसगड 624 2667 14 3305
8 दादरा-नगर हवेली आणि दिव-दमण 183 114 0 297
9 दिल्ली 25620 72088 3115 100823
10 गोवा 745 1061 7 1813
11 गुजरात 8497 26315 1960 36772
12 हरियाणा 3893 13335 276 17504
13 हिमाचल प्रदेश 303 763 11 1077
14 जम्मू-काश्मीर 3219 5318 138 8675
15 झारखंड 759 2068 20 2847
16 कर्नाटक 14389 10527 401 25317
17 केरळ 2254 3341 27 5622
18 लडाख 168 836 1 1005
19 मध्यप्रदेश 3088 11579 617 15284
20 महाराष्ट्र 87699 115262 9026 211987
21 मणिपूर 656 734 0 1390
22 मेघालय 36 43 1 80
23 मिझोराम 64 133 0 197
24 नागालँड 382 243 0 625
25 ओडिशा 3002 6486 38 9526
26 पद्दुचेरी 459 331 12 802
27 पंजाब 1828 4494 169 6491
28 राजस्थान 3949 16278 461 20688
29 सिक्किम 60 65 0 125
30 तमिळनाडू 46836 66571 1571 114978
31 तेलंगणा 10646 14781 306 25733
32 त्रिपुरा 460 1219 1 1680
33 उत्तराखंड 533 2586 42 3161
34 उत्तर प्रदेश 8718 19109 809 28636
35 पश्चिम बंगाल 6973 15235 779 22987
  इतर 5034     5034
  एकूण# 259557 439948 20160 719665
 

महाराष्ट्रात नेमकी स्थिती काय?

राज्यात गेल्या २४ तासात ५३६८ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता २,११,९८७ एवढी झाली आहे. तर ३५२२ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १,१५,२६२ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ८७६९९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात मागील २४ तासात २०४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ९०२६ रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. 

दरम्यान, देशात १ जुलैपासून अनलॉक २.० सुरु आहे. अनलॉक २.० मध्ये अनलॉक १.० प्रमाणेच काही गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी पुन्हा एकदा कडक अनलॉक करण्यात आला आहे.   

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने तीन भागात देशाचे विभाजन केले होते. पहिला हॉटस्पॉट जिल्हे (रेड झोन) , दुसरे करोनाचे रुग्ण आढळले पण हॉटस्पॉट नसलेले जिल्हे (ऑरेंज झोन) आणि तिसरा ग्रीन झोन जिथे करोना रुग्ण नाहीत, असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी