मेट्रोसमोर उडी मारून २६ वर्षीय महिलेची आत्महत्या 

Delhi Metro: राजधानी दिल्लीमध्ये मेट्रोसमोर उडी मारुन एका २६ वर्षीय महिलेने आत्महत्या केली. ज्यामुळे येलो लाइन काही काळ ठप्प झाली होती. 

woman_suicide_in_delhi_metro
मेट्रोसमोर उडी मारून २६ वर्षीय महिलेची आत्महत्या   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • मेट्रोसमोर उडी मारुन महिलेने केली आत्महत्या
  • दिल्लीत मॉडेल टाऊन मेट्रो स्टेशनवर महिलेची आत्महत्या
  • या घटनेमुळे दिल्लीची येलो लाइन काही काळ झाली होती ठप्प

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये मागील काही दिवसांपासून मेट्रोसमोर आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे. आज (रविवार) मॉडल टाऊन मेट्रो स्टेशनवर एका २६ वर्षीय महिलेने चालत्या मेट्रोसमोर उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली. ज्यामुळे काही काळ येलो लाइनची सेवा ठप्प झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला ही पहाडगंज येथे राहणारी असून तिचं नाव सोनाक्षी गर्ग असं होतं. दिल्ली मेट्रोची येलो लाइन ही समयपूर बादलीला गुरुग्रामच्या हुडा सिटी सेंटरपर्यंत जोडलेली आहे.

दिल्ली मेट्रोच्या एका अधिकाऱ्याने याबाबत अशी माहिती दिली आहे की, 'या घटनेमुळे मेट्रोची सेवा १५-२० मिनिटं ठप्प झाली होती.' पोलिसांनी अशी माहिती दिली की, महिलेला बाबू जगजीवन राम रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तिथे तिला मृत घोषित केलं गेलं. तिचं शव पोस्टमार्टमसाठी रुग्णालयातच ठेवण्यात आलं आहे. 

दरम्यान, पोलिसांनी अशीही माहिती दिली की, महिलेजवळ एक सुसाइड नोट देखील सापडली आहे. ज्यामध्ये असं म्हटलं आहे की, 'यासाठी कुणालाही जबाबदार धरु नये.' 

 

 

दिल्ली मेट्रोच्या मते, हुडा सिटी सेंटरकडे जाणारी मेट्रो ही जेव्हा प्लॅटफॉर्मवर आली त्याचवेळी महिलेने त्याच्यासमोर उडी मारुन आत्महत्या केली. पोलिसांच्या मते, मृत महिलेवर गेल्या काही दिवसांपासून मानसिक विकारांवर उपचार सुरु होते. त्यामुळे या घटनेमध्ये कुणाचा हात असण्याची शक्यता फारच कमी वाटते. मात्र, तरीही दिल्ली पोलीस संबंधित महिलेविषयी आणि संपूर्ण घटनेबाबत तपास करत आहेत. 

दरम्यान, अशी घटना पहिल्यांदा घडलेली नाही. याआधी देखील मेट्रोसमोर उडी मारुन आत्महत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अशाच प्रकारे एक महिलेने मेट्रोसमोर उडी मारुन आत्महत्या केली होती. पण त्यावेळी त्या महिलेकडून कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट मिळाली नव्हती. जोपर्यंत पोलीस घटनास्थळी पोहचले तोवर महिलेने आपले प्राण गमावले होते. तसंच मागील ऑगस्ट महिन्यात टागोर गार्डन मेट्रो स्टेशनवर देखील एका व्यक्तीने मेट्रोसमोर उडी मारुन आत्महत्या केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...