दहशतवादी हाफिझ सईदला ३१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

26/11 Mastermind Hafiz Saeed Convicted By Pakistan Court Sentenced 31 Years In Prison : लष्कर-ए-तोयबा या संघटनेचा प्रमुख दहशतवादी हाफिझ सईद याला कोर्टाने दोषी ठरविले आणि ३१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

26/11 Mastermind Hafiz Saeed Convicted By Pakistan Court Sentenced 31 Years In Prison
दहशतवादी हाफिझ सईदला ३१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा 
थोडं पण कामाचं
  • दहशतवादी हाफिझ सईदला ३१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
  • ३.४ लाख रुपयांचा दंड ठोठावला
  • हाफिझ सईद याच्या नावावर असलेली सर्व संपत्ती जप्त करण्याचे आदेश

26/11 Mastermind Hafiz Saeed Convicted By Pakistan Court Sentenced 31 Years In Prison : लाहोर : पाकिस्तानमधील लाहोरच्या दहशतवाद विरोधी कोर्टाने शुक्रवार ८ एप्रिल २०२२ रोजी एक मोठा निर्णय दिला. लष्कर-ए-तोयबा या संघटनेचा प्रमुख दहशतवादी हाफिझ सईद याला कोर्टाने दोषी ठरविले आणि ३१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. मुंबईमध्ये २६/११ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या हाफिझला दोन बेकायदा फंडांच्या माध्यमातून निधी संकलन केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले. संयुक्त राष्ट्रांच्या काळ्या यादीत असलेल्या दहशतवादी हाफिझ सईद याला लाहोरच्या दहशतवाद विरोधी कोर्टाने ३.४ लाख रुपयांचा दंड ठोठावला. हाफिझ सईद याच्या नावावर असलेली सर्व संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले. यात हाफिझच्या मालकीच्या मदरशांचाही समावेश आहे. न्या. एजाझ अत्तार यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला.

दहशतवादाला पुरस्कृत करणाऱ्या पाकिस्तानला एफएटीएफने (Financial Action Task Force - FATF / आर्थिक कृती कार्यदल / वित्तीय कारवाई कार्यदल) जून २०२२ पर्यंत 'ग्रे लिस्ट'मध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही मुदत संपण्याच्या सुमारास एफएटीएफची पुन्हा बैठक होईल. या बैठकीत पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईचा आढावा घेतला जाईल. यानंतर पाकिस्तानला एफएटीएफच्या कोणत्या लिस्टमध्ये ठेवावे याचा निर्णय होणार आहे. यामुळेच पाकिस्तानने हाफिझ विरोधात कारवाई केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. अर्थात पाकिस्तानकडून अधिकृतरित्या तरी हाफिझविरोधात कायदेशीर कारवाई झाली, असेच सांगितले जात आहे.

इमरान खान यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा दणका

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने विरोधकांचा अविश्वासदर्शक ठराव नॅशनल असेंब्लीच्या डेप्युटी स्पीकरने फेटाळण्याचा निर्णय घटनाबाह्य ठरवला. तसेच नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याचा निर्णय रद्द केला. यामुळे विसर्जित होण्याआधीची नॅशनल असेंब्ली पुन्हा स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला.

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नॅशनल असेंब्लीत शनिवार ९ एप्रिल २०२२ रोजी विरोधकांनी सादर केलेल्या अविश्वासदर्शक ठरावावर मतदान होणार आहे. या मतदानासाठी नॅशनल असेंब्लीचे कामकाज शनिवारी सकाळी किंवा साडेदहा वाजता सुरू होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी