अबब... Arpita Mukherjee च्या टॉयलेटमध्येही 29 करोड कॅश, 5 KG सोनं..

partha chatterjee : पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या दुसऱ्या फ्लॅटवर ईडीने बुधवारी छापा टाकला. यादरम्यान ईडीला २८.९० कोटी रुपये रोख आणि ५ किलो सोने मिळाले. एवढी मोठी रक्कम मोजण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांना 10 तास लागले, त्यासाठी तीन नोटा मोजण्याची मशीनही मागवण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे अर्पिताने हे पैसे फ्लॅटच्या टॉयलेटमध्ये लपवले होते.

29 crore cash, 5 kg gold...  cash queen Arpita Mukherjee, the treasure was buried in the toilet
अबब... Arpita Mukherjee च्या टॉयलेटमध्ये 29 करोड कॅश, 5 KG सोनं..   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ईडीने बुधवारी सकाळी दक्षिण कोलकातामधील राजदंगा आणि बेलघरिया येथील अनेक ठिकाणी छापे टाकले
  • नोटा मोजण्यासाठी 10 तास
  • फ्लॅटमधून सुमारे 29 कोटी रोख (28.90 कोटी रुपये) आणि 5 किलो सोने मिळाले.

ED, cash from Arpita flat : शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा कोलकात्यातील तीन ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान ईडीला अर्पिता मुखर्जीच्या बेलघरिया येथील दुसर्‍या फ्लॅटमधून सुमारे 29 कोटी रोख (28.90 कोटी रुपये) आणि 5 किलो सोने मिळाले. हे पैसे मोजण्यासाठी ईडीच्या टीमला सुमारे 10 तास लागले. धक्कादायक बाब म्हणजे अर्पिताने हे पैसे फ्लॅटच्या टॉयलेटमध्ये लपवले होते. (29 crore cash, 5 kg gold...  cash queen Arpita Mukherjee, the treasure was buried in the toilet)

खरेतर, शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात ईडीने नुकतेच पश्चिम बंगालमधील ममता सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली होती. अर्पिता मुखर्जी पार्थ चॅटर्जीची निकटवर्ती आहे. 5 दिवसांपूर्वीच ED ला अर्पिताच्या फ्लॅटमधून 21 कोटींची रोकड आणि सर्व मौल्यवान वस्तू मिळाल्या होत्या. अर्पिताला ईडीने २३ जुलै रोजी अटक केली होती.

दुसरीकडे, ईडीच्या या कारवाईनंतर विरोधी पक्ष पार्थ चॅटर्जी यांना टीएमसीच्या मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी करत आहेत. एवढेच नाही तर शिक्षक भरती घोटाळ्यातील मनी ट्रेलची चौकशी करणाऱ्या ईडीने पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष टीएमसी आमदार माणिक भट्टाचार्य यांचीही चौकशी केली. ईडीने बुधवारी सकाळी दक्षिण कोलकातामधील राजदंगा आणि बेलघरिया येथील अनेक ठिकाणी छापे टाकले, ही मालमत्ता कथित अर्पिता मुखर्जी यांच्या मालकीची आहे. अर्पिता मुखर्जीने ईडीच्या चौकशीदरम्यान या संपत्तीचा खुलासा केला होता.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी