दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०२ नोव्हेंबर २०१९: शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची मदत ते किंग खानचा बर्थडे

Headlines of the 02th November 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Daily news
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०२ नोव्हेंबर २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०२ नोव्हेंबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून १० हजार कोटी रूपयांची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली.  दुसरी बातमी म्हणजे,  सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या या वक्तव्याचा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यासंदर्भात वक्तव्य केलं. तिसरी आजची बातमी, रोहित पवारांच्या विजयी मिरवणुकीदरम्यान जेसीबीतून गुलाल उधळण्यात आला. याची बरीच चर्चाही झाली आणि यावरून रोहित पवारांवर टीकाही करण्यात आली. चौथी आजची बातमी,  नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना पोस्टात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कलने तब्बल ३६५० पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पाचवी आजची महत्त्वाची बातमी,  बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान २ नोव्हेंबर रोजी आपला ५४वा वाढदिवस साजरा करत आहे. या सविस्तर बातम्या वाचूया. 

  1. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची तरतूद, मुख्यमंत्र्यांची माहिती : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी तातडीची मदत सरकारतर्फे करण्यात येणारेय. शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून १० हजार कोटींची मदत मिळणार आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  2. 'सामना'तून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना सुनावले खडेबोल : सत्ता स्थापनेवरुन शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्ता संघर्ष आता आणखी वाढला आहे. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्याचा सामनातून समाचार घेण्यात आला आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे लिंकवर क्लिक करा.
  3. मिरवणुकीत 30 जेसीबीनं गुलाल उधळला, रोहित पवारांचं फेसबुकवरून स्पष्टीकरण : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी नुकतीच आपल्या मतदारसंघात जल्लोष करण्यासाठी विजयी मिरवणूक काढली. या टीकेला आता रोहित पवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे लिंकवर क्लिक करा.
  4. मराठी तरुणांना नोकरीची संधी, पोस्टात तब्बल ३६५० पदांसाठी मेगाभरती, शिक्षण केवळ १०वी पास : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना पोस्टात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कलने तब्बल ३६५० पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  5. जेव्हा छोटा शकीलला घाबरून 'या' अभिनेत्रीच्या कारमध्ये लपून बसला शाहरूख खान :   बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान २ नोव्हेंबर रोजी आपला ५४वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरूख खान जेव्हा अंडरवर्ल्ड डॉनला घाबरून राणी मुखर्जीच्या कारमध्ये लपून बसला होता. हा किस्सा जाणून घेण्यासाठी आणि शाहरूखचे खास फोटो पाहण्यासाठी क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी